Top Newsराजकारण

लतादीदींच्या अंत्यसंस्कार प्रसंगी घडलेल्या काही घटना, ज्यामुळे सुरु झाली चर्चा !

मुंबई : लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी रथी-महारथींनी शिवाजी पार्कात हजेरी होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील जातीनं हजर होतं. यावेळी दिग्गजांनी लतादीदींचे अंतिम दर्शन घेतलं. त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी घडलेल्या एका प्रसंगानं नरेंद्र मोदी यांचं लक्ष वेधून घेतलं. बापलेकीचं नातं कसं असावं? तर असं असावं, अशी प्रतिक्रिया देखील अनेकांनी दिली आहे. नेमका हा प्रसंग कॅमेऱ्यातही कैद झाला. खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे बाबा शरद पवार यांच्यात घडलेला हा विशेष प्रसंग पाहून नरेंद्र मोदीही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.

सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांचं अंत्यदर्शन घेतलं. यानंतर ते खाली येऊन खुर्चीवर बसलेही. त्यांच्यापाठोपाठ राज्यपाल, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनीही अंत्यदर्शनं घेतलं. दरम्यान, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही यावेळी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत त्यांना आदरांजली वाहिली. दरम्यान, आदर पूर्वक जायला हवं, म्हणून ज्येष्ठ राजकीय नेते असलेल्या शरद पवार यांनी आपल्या पायातील बूट खालीच काढले होते. यानंतर ते खाली उतरले तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी जे पाऊल उचललं, ते कौतुकास्पद होतं, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.

वडीलांना त्रास होतोय, कष्ट घ्यावे लागतील, त्यांना मदतीची गरज आहे, हे लगेचच सुप्रिया सुळे यांनी हेरलं. आपल्या पदाचा, राजकीय वलयाचा कसलाही विचार मनी न बाळगता, सुप्रिया सुळे यांनी आपल्या बाबांना अर्थात शरद पवार यांना पायात बूट घालण्यासाठी त्या लगेचच पुढे सरसावल्या. यावेळी समोरच बसलेल्या नरेंद्र मोदींनीही ही गोष्ट पाहिली आणि ते ही भारावून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना एका खुर्चीवर बसवलं. आपण स्वतः गुडघ्यावर बसून त्यांनी वडिलांच्या पायात बूट घालून देत त्यांची सेवा केली. आपल्या हातांनी त्यांनी केलेली ही गोष्ट छोटीशी जरी असली, तरी कॅमेऱ्यात टिपली गेली, जिला महत्त्व आलं नसतं तरच नवल! सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे एकत्र लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले होते. आपल्या बाबांची मदत करण्यासाठी, त्यांना काहीही कमी-जास्त व्हायला नको, त्रास व्हायला नको, याची काळजी घेताना खासदार सुप्रिया सुळे यावेळी शिवाजी पार्कात दिसून आल्यात.

आधी दुवा, मग हात जोडून अखेरचं दर्शन, नंतर शाहरुख थुंकला?

सुपरस्टार शाहरुख खान यानं लतादीदींच्या अंत्यदर्शनावेळी केलेली कृती चांगलीच गाजतेय. अनेकांनी शाहरुख खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओही व्हायरल होत आहे. शाहरुख खान पत्नी गौरीसह लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनासाठी आला होता. तेव्हा त्यानं दोन्ही हात फैलावून आधी लता मंगेशकर यांच्यासाठी दुवा मागितली. यानंतर मास्क खाली करुन तो काहीतरी करताना दिसला. मग दोन्ही हात जोडून शाहरुख खाननं लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला प्रदक्षिण घातला. या संपूर्ण प्रकारावरुन सोशल मीडियात एका नवा वाद चर्चिला जातो आहे. शाहरुख खाननं दुवा मागितल्यानंतर मास्क खाली करुन केलेली कृती ही थुंकण्याचा प्रकार होता, असा आरोप अनेकांनी केला आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय.

अनेकांनी ट्वीटरवर पोस्ट करत शाहरुख खाननं मास्क खाली करुन लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी तो थुंकला असा दावा केला आहे. काहींच्या मते शाहरुख खानं असं करुन लता मंगेशकर यांचा अपमान केला असल्याची टीकाही केली आहे. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटलंय. पण खरंच शाहरुख खाननं असं केलंय? तो खरंच थु्ंकलाय का?

अगदीच थेट सांगायचं, तर शाहरुख खान हा थुंकलेला नाही. थुंकना आणि फुंकना यात जमीन अस्मानाचा फरक असतो, हे वेगळं सांगायचा नकोच. पण दोन्ही गोष्टी करताना आपल्या ओठांची होत असलेली रचना सारखी असल्यामुळे अनेकांचा गैरसमज झाला. पण ही गोष्ट अनेकांनी समजून घेण्याच्या आधीच विखारी टीका शाहरुख खानवर करण्यास सुरुवात केली.

थुंकना आणि फूंकना यातील फरक

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना अनेक मुस्लिम युजर्सनी चांगलंच सुनावलंय. शाहरुखने केलेल्या कृतीला फूंकना असं म्हणतात, असं रुबिना लियाकन या ट्वीटर युजननं म्हटलंय. रुबिका यांनी केलेल्या दाव्यानुसार शाहरुख केलेली कृती म्हणते फातिहा पढणं असतं. याला आदरांजली वाहणं असही म्हणता येऊ शकेल. दुआ म्हटल्यानंतर हळूवार फुंकर घालायची, असी रित मुस्लिम बांधवांमध्ये असते. शाहरुखनं नेमकं तेच केलं होतं. पण याच गोष्टीवरुन अनेकांनी गैरसमज परसवण्याचा कित्ताच सुरु केल्याचं ट्वीटरवर पाहायला मिळतंय. अनेकांनी शाहरुखला अत्यंत वाईट प्रकारे ट्रोल केलं असल्याचं दिसून आलं असून शाहरुख याच गोष्टीमुळे ट्वीटरवर ट्रेन्ड होतोय. पण या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी ही संपूर्ण घटना, त्याचा अर्थ हेदेखील समजून घेणं, तितकंच गरजेचचं आहे.

मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरेंचा संवाद

पंतप्रधान राज्यात येणार म्हटल्यावर नेहमीचा शिरस्ता सांभाळावा लागणार होताच. मोदींच्या आगमनावेळी खरंतर उद्धव ठाकरे यांनीही हजर राहणं अपेक्षित होतं. पण मोदी जेव्हा मुंबईत विमानतळावर दाखल झालं, तेव्हा त्यांच्या आगमनावेळी त्यांचं औपचारीत स्वागत करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्याही हजर होते. राजशिष्टाचार आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हेही तेव्हा उपस्थित होते. तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही यावेळी मोदींनी रिसीव्ह करण्यासाठी हजर होते. याच वेळचा एक फोटोदेखील समोर आला आहे. या फोटोमध्ये नरेंद्र मोदी यांचं औपचारीक स्वागत केल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासोबत मोदींनी चर्चा केली. काही काळ ते थांबले. आदित्य ठाकरेंशी बोलले. यावेळी नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय तर्कवितर्क लढवले गेले नसते, तरच नवल!

मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर नरेंद्र मोदी यांचं हात जोडून सगळ्या आधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वागत केलं. त्यानंतर राज्यपालांच्या शेजारी उभे असलेल्या राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे हे देखील मोदींना रिसीव्ह करण्यासाठी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंनीही हात जोडून मोदींचं स्वागत केलं. मोदींनीही हात जोडत नम्रतापूर्वक त्यांना प्रतिसाद दिला. पण मोदी इथेच थांबले नाहीत. यानंतर मोदींनी आदित्य ठाकरेंसोबत काही वार्तालाप केला. त्यांना काही विचारणा केली. तेव्हा मोदींच्या डोळ्यात डोळे घालून आदित्य ठाकरे संवाद साधताना दिसले. याबाबतचा फोटो जो समोर आला आहे, त्यात मोदींचा प्रश्न आदित्य ठाकरे अत्यंत बारकाईनं ऐकताना दिसून आले आहेत. मागच्या बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारीही दिसलेत.

एकीकडे या फोटोमध्ये आदित्य ठाकरे यांची मोदींसोबत थेट नजरानजर करत बातचीत सुरु असल्याचं दिसतंय. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची नजर मात्र खाली असल्याचं फोटोमध्ये कैद झालंय. या वेळी मोदींनी नेमकी कोणत्या गोष्टींची चौकशी आदित्य ठाकरेंकडे केली असावी, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. राजशिष्टाचार मंत्री असल्याच्या नात्यानं आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी मोदींनी रिसीव्ह करण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले होते.

पंतप्रधान मोदींचे शिवाजी पार्कात आगमन आणि पवारांच्या बाजूला बसलेले मुख्यमंत्री उठले

लता मंगेशकर यांचं अखेरचं दर्शन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. संपूर्ण सुरक्षेसह मोदींचा ताफा हा मुंबई विमानतळावरुन वरळी सी-लिंक मार्के दादरच्या शिवाजी पार्कात पोहोचला. यावेळी आधीच शिवाजी पार्कात दाखल झालेल्या राजकीय नेते मंडळींचीही मोदींनी भेट घेतली. अंत्यसंस्कारासाठी आधीच शिवतीर्थावर पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी हात जोडून नरेंद्र मोदी यांनी औपचारीक भेट घेतली. त्यानंतर मोदी हे लता मंगेशकर यांच्या पार्थिवाच्या दिशेने निघाले. मध्ये एके ठिकाणी थांबून ते एका खुर्चीवर बसतील की काय, असं वाटलं खरं. पण काही क्षण ते स्तब्ध राहिले. यानंतर ते बाजूलाच असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या दिशेनं पुढे निघाले.

यावेळी नरेंद्र मोदी नेमके कुठे जात आहेत, त्याचे हावभाव कसे आहेत, याकडे जावेद अख्तर यांची बारीक नजर होती. संपूर्ण व्हिडीओमध्ये जावेद अख्तर हे नरेंद्र मोदी यांना बारीकपणे न्याहाळताना दिसले. दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या दिशेने मोदी जात आहेत, हे पाहून मोदींचे सुरक्षारक्षकही त्या दिशेनं चालू लागले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दिशेनं येत आहेत, हे पाहून शरद पवारांच्या शेजारी बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उठले. सोबतच शरद पवारही उठले. महाराष्ट्राच्या या दोन्ही दिग्गज नेत्यांना नरेंद्र मोदी यांनी हात जोडून नमस्कार केला. याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हात जोडून नमस्कार करत प्रतिसाद दिला. अवघ्या काही क्षणांच्या या भेटीमध्ये एक अक्षरही संवाद झाला नाही. मात्र शरद पवार हे एका हातानं उद्धव ठाकरे यांना काहीतरी खुणावताना व्हिडीओमध्ये दिसले.

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराच्या निमित्तानं समोर आलेले हे तीन महत्त्वाचे नेते, त्यांनी एकमेकांना केलेला नमस्कार, अप्रत्यक्ष भेट, याचे अनेक राजकीय अर्थ आहेत. या भेटी दरम्यानची नरेंद्र मोदींची देहबोली, उद्धव ठकरे आणि शरद पवार यांची देहबोली, याचेही अनेक अर्थ, तर्क वितर्क काढले जात आहेत. एकेकाळी राजकीय मित्र असलेला पक्ष, एकेकाळची युती, तेव्हाचं नात आणि आता शरद पवारांच्या शेजारी उद्धव ठाकरेंची असलेली जवळीक हे सगळं पाहून नरेंद्र मोदी यांच्या मनात नेमकं काय आलं असेल? असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला नाही, तरच नवल!

महापौर किशोरी पेडणेकरांचा फडणवीसांच्या विमानातून प्रवास

पुण्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एका लग्ननात एकत्र येत चर्चा झाली. ही बातमी ताजी असताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिफ्ट दिल्याची माहिती समोर आली आहे. गोव्यात सध्या निवडणुकांचा धुरळा उडतोय. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळी गोव्याच्या प्रचारात उतरले आहेत. शिवसेना आणि भाजप पूर्ण जोर लाऊन लढत आहे. देवेंद्र फडणवीसही गोव्याचे प्रभारी असल्याने गोव्यातच होते. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही गोव्यात शिवसेनेच्या प्रचाराला गेल्या होत्या. गोव्यात प्रचार जरी एकमेकांविरोत करत असले तरी सकाळी दोघं एकाच विमानाने मुंबईला आले आहेत. फडणवीसांच्या विमानात महापौरांना लिफ्ट मिळाली आहे.

महापौर गोव्याच्या प्रचारात असतानाच अचनाक लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी आली. मुंबईच्या पहिल्या नागरिक असणाऱ्या महापौर पेडणेकर यांना पणजी येथून मुंबईकडे सकाळी फ्लाईट मिळत नव्हती. त्यानंतर फडवणीस यांच्याशी महापौर पेडणेकर यांनी संपर्क करत गोव्यातून येणाऱ्या चार्टरमध्ये लिफ्ट घेतली. फडवणीस, गोवा सीएम प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हे चार्टर प्लेनने गोव्यातून मुंबईला आले. याच विमानातून महापौर पेडणेकर यांना मुंबईत आणण्यात आले. फडणवीस आणि महापौर यांच्यातील राजकीय वाद, तसेच महापौर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका. शिवेसना आणि भाजपा उडत असलेले दररोज खटके अशातच नाजूक प्रसंगात महापौर आणि फडवणीस यांचा राजकीय प्रवास चर्चेचा विषय झालाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button