नवी दिल्ली : देशभरात कोरोनामुळे अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राजधानी दिल्लीतही रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
दिल्लीत ५ जानेवारी रोजी ५ हजार रुग्ण आढळून आले होते. आता, शनिवारी हीच रुग्णसंख्या २४ तासांत २० हजारांवर पोहोचली आहे. तर, आज २२ हजार रुग्णसंख्या असेल, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. मात्र, घाबरण्याचं कारण नाही, असे म्हणत केजरीवाल यांनी लॉकडाऊनसंदर्भातही स्पष्टपणे भूमिका मांडली. जर तुम्ही मास्क लावणार असाल तर मी लॉकडाऊन लावणार नाही. सध्या रुग्णालयात भरती करण्यात येणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे घाबरुन जाऊ नका, असेही केजरीवाल यांनी म्हटले.