आरोग्य

कोविड-19 लॉकडाऊननंतर बॅरिॲट्रिक शस्त्रक्रियात लक्षणीय वाढ

मुंबई : एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे कीस्थूलत्व असणाऱ्या प्रौढांना कोविड-19 चीलागण आणि त्यात गुंतागुंत होण्याचा धोका अधिक असतो. [1] स्थूलत्वामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि विविध विषाणूंची लागण होण्याचाधोका वाढतो. स्थूलत्वामुळे फुफ्फुसांचे कार्य मंदावते, उच्छ्वासाची क्रिया मंदावून श्वासोच्छवासात अडथळे निर्माणहोतात. यामुळे स्थूल व्यक्तींना कोविड-19 मधील अतिरिक्त गुंतागुंतीचा धोका निर्माण होतो. [1]या उपाय म्हणून अनेकरुग्ण कोविड-19 लॉकडाऊननंतर बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेत आहेत.

या बद्दल डॉ. मुफज्ज़ल लकड़ावाला, डायरेक्टर अॅण्ड हेड, डिपार्टमेंट फॉर जनरल अॅण्ड मिनिमल एक्सेस सर्जरी,सर एच. एन. रिलायंस फाऊंडेशन हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर म्हणाले “कोविड-19 च्या या जागतिक महासंकटात वाढत्या मृत्यूदरामागीलसहव्याधींमध्ये स्थुलता हे सर्वात मोठे कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा पद्धतीच्या पहिल्याच मेटा-अॅनालिसिसमध्ये संशोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय टीमने 399,000 रुग्णांचा अभ्यास केला.SARS-CoV-2 ची लागण झालेल्या आरोग्यदायी वजन असलेल्या लोकांच्या तुलनेतस्थूल व्यक्तींचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण 113 टक्के अधिक होते, आयसीयूमध्ये अॅडमिट होण्याचे प्रमाण 74 टक्के अधिक होते आणि मृत्यू होण्याची शक्यता 48 टक्के रुग्णांमध्ये अधिक होती. दुसऱ्या एका, कोविड-19 च्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट असलेल्या रुग्णांच्याअभ्यासानुसार 17000 रुग्णांपैकी 77 टक्के रुग्णांना अधिक वजन (29 टक्के) आणि स्थूलतेचा (48 टक्के) त्रास होता.”

डॉ. लकडावाला पुढे म्हणाले, “स्थुलतेचा रोगप्रतिकारशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो, हे सिद्ध झाले आहे. मधुमेह, हृदयविकार, हायपरटेन्शन, फॅटी लिव्हर आणि शाश्वाचे आजार अशा अनेक सहव्याधीस्थुलत्वाशी निगडित असतात. स्थुल व्यक्तींना कोविड-19 मध्ये फारच वाईट अनुभव आला. कारण, त्यांना सर्व बाजूंनी धोके होते. एकीकडे त्यांना लागण होण्याची भीती होती आणि दुसरीकडेज्यांना स्थुलपणा घालवण्यासाठी शस्त्रक्रिया करायची होती त्यांना लॉकडाऊनमुळे तेकरता आले नाही. अर्थातच, स्थुलत्व कमी करण्यासाठी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या रुग्णांच्यासंख्येत कोविड-19 लॉकडाऊननंतर लक्षणीय वाढ झाली आहे. लॉकडाऊननंतर आता आम्ही अधिक शस्त्रक्रिया करतो आहोत. लॉकडाऊनमध्ये आणि त्यानंतरच्या काळात बॅरिअॅट्रिकशस्त्रक्रियेच्या काही रंजक केसेस आम्ही अनुभवल्या. अशाच एक रुग्ण श्रीम. साक्षी (नाव बदलले आहे) यांनी जानेवारी 2020 मध्ये आमची भेट घेतली आणि फेब्रुवारीमध्ये त्यांची शस्त्रक्रिया करायची होती. हायपरटेन्शन, पीसीओएस, जीईआरडी आणि सांध्यांची दुखणी अशा सहव्याधींसोबतच त्यांचाबीएमआय जवळपास 40 वर पोहोचला होता. मात्र, देशभरात लॉकडाऊन झाल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलावीलागली. ऑगस्ट 2020 मध्ये आम्ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केल्याबरोबर श्रीम. साक्षी या आम्ही शस्त्रक्रिया केलेल्या पहिल्या रुग्णहोत्या. आम्ही त्यांच्यावर केलेली बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया यशस्वीझाली आणि त्या आता अगदी बऱ्या आहेत. दुसरे एक रुग्ण श्री. माधव (नाव बदलले आहे) यांनीही जानेवारी 2020 मध्ये आमची भेट घेतली. त्यांचे वजन 200 किलोपेक्षाही अधिक होते आणि बीएमआय जवळपास 73 होता. त्यांना स्लीप अपेना आणि सांधेदुखी अशा सहव्याधी होत्या. लॉकडाऊनमध्ये त्यांच्यासाठी परिस्थिती अधिकच गंभीर झाली. कारण, इतक्या जास्त वजनामुळे त्यांना कोविडची लागण होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे, काही प्रमाणात लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले आणि विमानतळे खुली झाल्यानंतरत्यांनी लगेचच आमच्याकडे येऊन बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करून घेतली. त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.”

स्थुलता, टाईप-2 मधुमेह आणि सहव्याधी तसेच मद्यव्यतिरिक्तचे फॅटी लिव्हरचेआजार आणि स्टेथोपेटायटिस अशा आजारांमध्ये बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रिया हा सर्वाधिकपरिणामकारक उपचार आहे. गॅस्ट्रिक बलून आणि एंडोस्कोपी स्लीव्ह गॅस्ट्रोप्लास्टीअशा बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियांमध्ये आधुनिक प्रक्रियांमुळे ही शस्त्रक्रिया अधिकउत्तम झाली आहे.नुकत्याच काही संशोधनातून हे स्पष्ट झाले आहे की जगभरात 1.9 अब्जांहून अधिक प्रौढांचे वजन जास्त आहे आणि 650 दशलक्ष व्यक्ती स्थुल आहेत. सुमारे 2.8 दशलक्ष मृत्यू अतिरिक्त वजन किंवा स्थुलतेमुळे होतात. भारतात, 135 दशलक्षांहून अधिक व्यक्ती स्थुल आहेत तर ओटीपोटाकडीलस्थुलता हे कार्डिओव्हस्क्युलर डिसीज (सीव्हीडी)मागील सर्वात मोठे कारण आहे.

References:
[1] Dicker D, Bettini S, Farpour-Lambert N, Frühbeck G, Golan R, Goossens G, Halford J, O’Malley G, Mullerova D, Ramos Salas X, Hassapiou M, N, Sagen J, Woodward E, Yumuk V, Busetto L: Obesity and COVID-19: The Two Sides of the Coin. Obes Facts 2020;13:430-438. doi: 10.1159/000510005

[2] Ahirwar R, Mondal PR. Prevalence of obesity in India: A systematic review. Diabetes Metab Syndr. 2019 Jan-Feb;13(1):318-321. doi: 10.1016/j.dsx.2018.08.032. Epub 2018 Sep 21. PMID: 30641719.

इथे नमूद केलेली कोणतीही किंवा सर्व माहिती ही डॉ. मुफज्जल लकडावाला यांनी फक्त साधारण दृष्टिकोन आणि अभ्यासाच्या दृष्टीने मांडलेली वैयक्तिक मते आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button