काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत राहून शिवसेनेला भ्रष्टाचाराचा गुण लागला : चंद्रकांत पाटील
पुणे : अरेरावी, हम करे सो कायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा स्थायी भाव आहे. भ्रष्टाचार आणि अरेरावी स्थायी भाव आहे. त्यांच्यासोबत राहून ते गुण शिवसेनेला लागले आहेत. कोरोनाचे संकट असताना मराठा समाजाच्या तरुण-तरुणींमध्ये अनिश्चितमध्ये पुढे काय होणार असा जो मनातला असंतोष आहे. तो कोरोनाच्या संकटामुळे व्यक्त करु नका असे म्हणता येणार नाही त्याला कोरोनाचे नियम पाळून, कोरोना प्रादुर्भावाचे भान ठेवून अंदोलन त्यांना करावे लागेल. मराठा आरक्षणामध्ये राज्य सरकारची चालढकल दिसून येत आहे. राज्य सरकारच्या चालढकलमुळे मराठा आरक्षण कायदा न्यायालयात रद्द करण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
एका बाजुला तुमचे सगळे चालू आहे. कोरोना संकट असताना गावातील रस्त्यांचा आग्रह कशासाठी करतायं असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तसेच याबाबत हायकोर्टात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही तुमचे सर्व राजकारण करत आहात आणि मराठा समाजातल्या तरुण तरुणींनी रस्त्यावर उतरु नये असे वाटत आहे. तुम्ही म्हणालात तरी कोणी एकणार नाही. राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यायचे नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्येच असे लिहिले आहे की, मागास आयोगाचे मराठी ट्रान्सलेशन मिळत नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाला रद्दचा निर्णय द्यायचा नव्हता परंतु राज्य सरकारच्या चालढकलमुळे कायदा रद्द करण्यात आला आहे.
पीएम केअर फंडातून राज्यासाठी आलेले व्हेंटिलेटर खराब आहेत. यामध्ये मोठा घोटाळा झाला असून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला गेला यावर त्यांनी उत्तर दिले की, आपल्या देशात कोणीही काहीही मागणी करु शकते. चंद्र अलीकडे कमी प्रकाश देतो त्याची चौकशी करा त्याची मागणी करु शकतात.
आयुष विभागाने चांगली गोळी आणली आहे. आयुष ६४ नावाची ज्या गोळीबाबत आयुषने सगळे संशोधन आणि प्रयोग केले आहेत. लक्षणे नसणाऱ्या रुग्णाला ती गोळी पाच दिवसात बरी करते. या एका डबीत ३० गोळ्या आहेत. पुण्यातील बऱ्याच भागात ही गोळी देणार आहोत असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ही गोळी देण्यात येणार आहे.