आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेतील राजस्थान रॉयल्स संघाची मालकीन हिंदी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा करोडपती अवलिया पती उचापतीखोर निघाला.राज कुंद्राच्या अश्लील वेब सिरीजचा सगळा काळा कारभार मुंबई पोलिस गुन्हे अन्वेषण विभागाने उजेडात आणला असून हे सर्व प्रकरण भल्याभल्यांची बोलती बंद करु शकत.
शिल्पा शेट्टी आणि उद्योजक राज कुंद्रा यांचा सन 2006 ला प्रेम विवाह झाला . या अगोदर दोघांचं तीन वर्षे डेटिंग सुरू होत.या दाम्पत्याला दोन मुलं आहेत , वरकरणी सरळ आणि साधं दिसणार हे दाम्पत्य मोठं चवचाल तर आहेच शिवाय तितकंच ते आतल्या गाठीच आहे .राजचा शिल्पाच्या अगोदर कविताशी पहिला विवाह झाला होता.
राज कुंद्रा हा मुळात अती श्रीमंत आहे ,तो ब्रिटीश नागरिक आहे.वडिलांचा हाॅटेल व्यवसायाला बगल देत त्याने विविध क्षेत्रातल्या दहा उद्योगांना सोन्याचे दिवस आणले परिणामी तो आजच्या घडीला आशिया खंडातील नामचीन उद्योगपती असून अडीच हजार कोटींचा मालक आहे.तर अशा उद्योगपतीने मुंबईतील मालाडच्या मग आयलॅंड भागात अर्धनग्न , नग्न अशी वेब सिरीज बनवण्याचा धंदा सुरू केला होता. तो धंदा गंदा है तो धंदा या प्रकारात मोडत असल्याने पोलिसांनी तो चव्हाट्यावर आणला.
चार फेब्रुवारीला सागरिका शोना व सोनम पांडे या नवख्या अभिनेत्रीच्या जोडगोळीने कुंद्राची कुंडली पोलिसात तक्रार देऊन उजेडात आणली.
या दोघींना कुंद्राचा व्यवस्थापक उमेश कामत फोन करून वेब सिरीजमध्ये अभिनेत्रीचा रोल देण्याची आॅफर देतो,या दोघी तयारी दर्शवतात, शुटिंगसाठी यांना मालाडला बोलावलं जात,तिथं सुरुवातीला हाॅट शाॅट नंतर अर्धनग्न व नंतर नग्न शुटिंगचा सिलसिला सुरू होतो या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही नवशिक्या अभिनेत्री पोलिसांत धाव घेतात असा हा सगळा घटनाक्रम आहे.
मुंबई पोलिस गुन्हे अन्वेषण विभागाचे जाॅईंट पोलिस कमिशनर मिलिंद भारंबे यांचं पथक शुटिंगच्या ठिकाणी छापेमारी करून तेथील सर्व इलेक्ट्रॉनिक्स साहित्यांसह अनेक वस्तू जप्त करतात .या प्रकरणी पोलिसांनी सहा फेब्रुवारीपासून आतापर्यंत अकरा बिन्नीच्या आरोपींना अटक केली आहे यात राज कुंद्राचा देखील समावेश आहे .
आपल्या देशात अशा अश्लील व्यवसायाला पुर्णपणे बंदी आहे म्हणून कुंद्रा आणि कंपनीने हा व्यवसाय लंडनस्थित आपली बहिण व मेव्हणा यांच्या माध्यमातून खुलेआम सुरू ठेवला होता . लंडनमध्ये कोणतीही कायदेशीर अडचण नाही म्हणून ही पळवाट कुंद्राने शोधली.मालाडला शुटिंग करायचे व या अश्लील वेब सिरीज लंडनला पाठवून तिथून विविध कंपन्यांना त्या वितरित करण्यात येत .युके किंवा युएस येथे या व्यवसायाला बंदी नाही तिथून तुम्ही करोडो कंपन्यांना या सिरीज आरामात वितरीत करु शकता, आकाशात जेवढे तारे आहेत तितक्याच या अगणित कंपन्या आहेत .
या व्यवसायाची आर्थिक व्याप्ती थक्क करणारी आहे . पाकिस्तान सरकारच जेवढं वर्षाच बजेट आहे तितकं म्हणजे सातशे चाळीस हजार कोटी रुपयांचा इतका हा अगडबंब नग्न व्यवसाय आहे . यातून सुमारे साडेचार कोटी लोकांना रोजगार मिळतो हे विशेष आहे , सध्या पाकिस्तानच बजेट हे आठशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आहे हा भाग अलाहिदा.
राज कुंद्रा हा सध्या पोलिस कोठडीत असला तरी तो कधीही जामिनावर सुटू शकतो कारण त्याच्यावर केवळ दोन अजामीनपात्र कलमे आहेत त्याअंतर्गत पोलिसांनी मागील तीन दिवसांपासून तपास केला आहे असा दावा कुंद्राचे वकील नक्कीच करतील .हे सगळं रॅकेट सिध्द झालंच तर कुंद्रा आणि कंपनीला जास्तीत जास्त पाच वर्षांसाठी तुरुंगवास आणि दहा लाखांचा दंड होऊ शकतो , अर्थात हे सर्व जर तरचा भाग आहे . वास्तविक राज कुंद्रा ही व्यक्ती पुर्वीपासून वादग्रस्त आहे .त्याच्यावर अनेक आरोप आहेत ,मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्यावर आय.पी.एल.सामने मैदानावर जाऊन बघण्यासाठी आजीवन बंदी आहे.तर असा अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा अवलिया उचापती पती.