शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत; नारायण राणेंचा दावा
मुंबई : महाविकास आघाडी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अधिक जोमानं एकसोबत निवडणूक लढणार अशी घोषणाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी केलीय. यावेळी पवार यांनी शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक केलं. तसंच ठाकरे आणि मोदी भेटीवर बोलताना त्यावर किंचितही विचार करण्याची गरज नसल्याचं पवार म्हणाले. त्यावर आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी मोठा दावा केलाय. शरद पवार बोलले असले तरी ते शिवसेनेबरोबर निवडणूक लढणार नाहीत. त्यांनी एकप्रकारे काँग्रेसला धमकी दिल्याचा दावा राणे यांनी केलाय.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत. ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो”, असं ट्वीट करत नारायण राणे यांनी पवारांच्या वक्तव्यावर भाष्य केलंय. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसला एकप्रकारे सावधगिरीचा इशाराही दिलाय.
ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 11, 2021