मुंबई – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. यासंदर्भात माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदुजा रुग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांची भेट घेतली. तसेच, त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चाही केली आहे. तसेच, अभिनेत्री सायरा बानू यांच्याशी चर्चा करुन माहिती जाणून घेतली. दिलीप कुमार हे लवकर ठणठणीत बरे होवोत, अशी प्रार्थना करत असल्याचंही शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
Visited legendary actor Shri Dilip Kumarji at Khar Hinduja Hospital today to check on his health and treatment, with the veteren actress Smt Saira Banu.
I wish Shri Dilip Kumarji a speedy recovery and good health!— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 6, 2021
दिलीप कुमार यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून घरीच उपचार सुरु होते. मात्र, आज रविवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक खालावली आणि त्यांना तातडीने हिंदुजा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. तूर्तास डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांच्या हवाल्याने एएनआयने याबाबतचे वृत्त दिले.