Top Newsराजकारण

संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात मतभेद नाहीत : खा. उदयनराजे भोसले

सातारा: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनीही मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे उद्या उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. पक्ष कोणता का असेना मराठा आरक्षणासाठी आता अधिवेशन बोलवण्याची गरज आहे. ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे, असे उदयनराजे यांनी म्हटले.

आरक्षण हे वेगवेगळ्या जातींना जीआर काढून देण्यात आलं, कोणाचं काढून न घेता आरक्षण द्या, मराठा समाजाबाबत भेदभाव का?, असा सवालही यावेळी उदयनराजेंनी उपस्थित केला. गायकवाड समितीचा अहवाल त्याचं व्यवस्थित वाचन झालं नाही, झालं असतं तर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला नसता, असा दावाही उदयनराजे भोसले यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button