रशियाचे राष्ट्रपती पुतीन म्हणतात, ‘तिसरे महायुद्ध अशक्य’!
मॉस्को : रशियाने इंग्लंडच्या युद्धनौका बुडवल्या असत्या, तरी तिसऱ्या महायुद्धाची याची शक्यता नव्हती. कारण पश्चिमेकडील शक्तींना माहीत आहे, की जागतिक युद्धात आता ते जिंकू शकत नाहीत, असा दावा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी केला आहे.
काळ्या समुद्रात गेल्या आठवड्यात इंग्लंडच्या विध्वंसक युद्धनौकांसोबतच अमेरिकेचे पाळत ठेवणारे विमानही कार्यरत होते. याच बरोबर, यातील एका युद्धनौकेने धमकीसाठी गोळीबारही केला आणि २३ जूनला इंग्लंडच्या या युद्धनौकांना क्रिमियाच्या द्विपकल्पाजवळून सहजतेने बाहेर जाता यावे, यासाठी डिफेंडरच्या मार्गावर विमानांच्या सहाय्याने बॉम्बदेखील टाकले, असे पुतीन यांनी म्हटले आहे. मात्र, इंग्लंडने असे काहीही घडले नाही, असा दावा केला आहे. तसेच त्यांच्या युद्धनौकेवर कुठल्याही प्रकारचा गोळीबार झाला नाही आणि ते यूक्रेनच्या समुद्री सीमेत होते, असेही इंग्लंडने म्हटले आहे.
पुतीन बुधवारी दीर्घ लाइव्ह कॉल-इन शोमध्ये म्हणाले, शक्यतो रशियन सैन्याकडून ब्रिटिश विध्वंसक युद्ध नौकांना मिळणाऱ्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवणे, हेच अमेरिकन विमानांचे मिशन होते. मॉस्कोला अमेरिकेच्या हेतूची कल्पना आहे आणि संवेदनशील आकड्यांचा खुलासा करण्यापासून वाचण्यासाठी त्याच अनुषंगाने उत्तर देण्यात आले.
इंग्लंडने गेल्या यासंदर्भात म्हटले होते की, त्यांच्या युद्धनौका डिफेंडर अंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त प्रवासाच्या मार्गात नियमितपणे कार्यरत होत्या आणि क्रिमियाजवळ यूक्रेनच्या समुद्री सीमेत होत्या. जगातील अधिकांश देशांप्रमाणेच इंग्लंडदेखील क्रिमियाला यूक्रेनचाच भाग मानतो. तर रशियाने हे द्विपकल्प वेगळे केले होते. यावर रशियानेही इशारा देताना म्हटले आहे, की यानंतर त्यांनी रशियन सैन्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, तर घुसखोरी करणाऱ्या युद्धनौकांना निशाणा बनविले जाऊ शकते.