रम्मी कल्चर अल्ट्रा डिल्स व नवीन गेम प्ले लाँच
बेंगळुरू : ‘गेम्सक्राफ्ट’ निर्मित रम्मी कल्चर या भारतातील सर्वात वेगाने विस्तारत असलेल्या रम्मी व्यासपीठाने नवीन गेमप्ले वैशिष्ट्ये व व्हेरिएण्ट्सच्या लाँचची घोषणा केली. नवीन वैशिष्ट्यांचा सर्व कुशल गेमर्ससाठी गेमिंग अनुभव अधिक सर्वसमावेशक करण्याचा आणि नवीन खेळाडूंमध्ये रम्मी खेळाची रूची वाढवण्याचा मनसुबा आहे. तसेच रम्मी कल्चरने नवीन गेम फॉर्मेट ‘अल्ट्रा डिल्स रम्मी’ देखील सादर केला आहे.
नवीन गेमप्लेमध्ये अनेक उत्साहवर्धक वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे प्रत्येक गेम अधिक गतीशील, अॅक्शन-पॅक व सर्वसमावेशक असेल. ही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
पॉइण्ट्स ग्रॅण्ड स्लॅम: खेळाडूंना अधिक पॉइण्ट्ससाठी खेळत आणि लीडरबोर्डवर अव्वलस्थानी पोहोचत दररोज मोठे बक्षीस जिंकण्याची संधी मिळते. जितके अधिक खेळाल तितके अधिक जिंकाल! या वैशिष्ट्यासह खेळाडू इतरांना त्यांची रम्मी कौशल्ये दाखवू शकतात.
अल्ट्रा-डिल्स रम्मी: रोमांचक गेम फॉर्मेट व जलद कम्प्लीशन वेळेसह प्रत्येक डाव जिंका – सर्व जिंका, सर्व गमवा हे स्वरूप गेमिंग अनुभवाला पॉइण्ट्स किंवा पूलच्या तुलनेत अधिक उत्साहवर्धक बनवते.
पारंपारिक पूल रम्मी खेळण्यासाठी पुरेसा वेळ नसेल तर ‘२ खेळाडू १ डिल’ खेळा. हा अत्यंत गतीशील गेम असण्यासोबत गतीशीलपणे निकाल व विजय मिळतो.
रम्मी कल्चर नाविन्यपूर्ण उत्पादन व अनुभवावर लक्ष केंद्रित करणे सुरू ठेवत आहे. तसेच कंपनीने युजर इंटरफेसमध्ये वैशिष्ट्यांच्या नवीन श्रेणीची देखील भर केली आहे, जसे –
सेपरेट ऑफर सेक्शन: एकाच लिस्टिंगमधून युजर सुलभपणे सर्व संबंधित ऑफर्सचा शोध घेऊ शकतो. हे पेज युजरला ऑफर्सबाबत पारदर्शकपणे माहिती करून घेण्यामध्ये मदत करते, ज्यामुळे पुढील अॅक्शन योग्यरित्या घेता येते.
सक्रिय कार्डस् व अद्ययावत स्क्रॅच कार्ड युजर इंटरफेससाठी ऑफर्स लॅण्डिंग पेजच्या माध्यमातून स्क्रॅच कार्डसची सुधारित व्हिजिबिलिटी.
न्यू गेम टेबल: गेमप्ले क्वेस्ट्समध्ये केलेली प्रगती दाखवते, ज्यामधून खेळाडूला अधिक खेळण्यास आणि मैलाचे दगड पार करण्यास प्रोत्साहन मिळते.
अधिक गेम्सचा आनंद घेणे सुरू ठेवण्यासाठी आणि लीडरबोर्डवर अव्वलस्थानी पोहोचण्यासाठी युजरला गेमप्ले लीडरबोर्ड क्रमांक दाखवते.
नवीन स्ट्रिमलाइन्सची निवड: अॅपमध्ये लॉग इन करताना त्रासमुक्त अनुभव मिळतो, ज्यामुळे खेळाडू ओटीपींबाबत चिंता न करता त्यांच्या गेमवर लक्ष केंद्रित करु शकतात.
या घोषणेबाबत बोलताना गेमक्राफ्टचे ब्रॅण्ड धोरण प्रमुख अमित कुशवाहा म्हणाले, नवीन वैशिष्ट्ये रम्मी कल्चरच्या सर्व रम्मीप्रेमींना सर्वोत्तम गेम खेळण्याचा अनुभव देण्याच्या दृष्टिकोनाशी संलग्न आहेत. ही वैशिष्ट्ये जलदपणे गेम्सचा आनंद घेण्याची इच्छा असलेल्या आणि पारंपारिक पूल रम्मीसाठी वेळ नसलेल्या लोकांसाठी विशेषरित्या डिझाइन करण्यात आली आहेत. आमचा डेटा आणि मागील युजर ट्रेण्ड्समधील माहितीनुसार आम्ही देशभरातील अधिकाधिक खेळाडूंना सर्वोत्तम गेम खेळण्याचा अनुभव देण्यासाठी आमच्या उत्पादनामध्ये सुधारणा केल्या आहेत. नवीन वैशिष्ट्यांचा आमच्या व्यासपीठाला अधिक युजर-अनुकूल, विश्वसनीय आणि ऑफर्स व गेम प्रोग्रेस दाखवण्यासाठी आमच्या दृष्टिकोनामध्ये वैयक्तिकरण आणण्याचा मनसुबा असेल. यामुळे खेळाडू अनावश्यक तपशीलांना टाळत त्यांच्या गेमप्लेवर लक्ष केंद्रित करु शकतील.
रम्मी कल्चरला त्यांचे अधिकाधिक युजर्स या सुधारणांचा अनुभव घेण्याची आणि मोठ्या यशांचा आनंद घेण्यासोबत त्यांची गेमप्ले कौशल्ये सुधारित करण्याची अपेक्षा आहे. या सुधारणांच्या माध्यमातून कंपनी व्यासपीठावरील खेळाडू व क्रियांची आकडेवारी वाढण्याची अपेक्षा करते, ज्यामुळे प्रतियुजर गेमप्लेच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ होईल.
गेम्सक्राफ्टने २०१७ मध्ये सुरू केलेल्या रम्मी कल्चर प्लॅटफॉर्मवर १ कोटी यूजर्सचा समुदाय आहे. स्पर्धकांना विनाव्यत्यय गेमिंगचा अनुभव मिळावा हे या प्लॅटफॉर्मचे उद्दीष्ट आहे. हे सर्व गेम्स अत्यंत यूजर-फ्रेंडली यूआयवर बनविले गेले आहेत व त्यामुळे अगदी पहिल्यांदाच हा खेळ खेळणा-यांना ते सहज समजून घेता येतात व विनासायास खेळता येतात. यूजर्सच्या मनातील कल ओळखणारे इऩ्ट्युइटिव्ह डिझाइन, विनाव्यत्यय, सुरक्षि आणि संरक्षित अनुभव हे गेम्सक्राफ्ट या पालक कंपनीचे काही यूएसपी आहेत. ही कंपनीही २०१७ मध्येच सुरू झाली असून गेमिंगचे वेड असलेल्या टेक्नोलॉजीच्या क्षेत्रातील अत्यंत अनुभवी व्यावसायिकांच्या ग्रुपने ही कंपनी स्थापन केली आहे.