महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यात निर्बंध लागणार : राजेश टोपे
मुंबई : सक्रिय कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये देशात टॉप टेनमध्ये असलेल्या पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अहमदनगर या आठ जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे संकेत दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ३० मार्चला पत्रकार परिषद घेऊन देशातील सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीमधील टॉप टेन जिल्ह्यांची माहिती दिली होती. त्यामध्ये महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा समावेश होता. त्याचं आठ जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत.
कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी आहे. या अनुषंगाने संपूर्ण आढावा घेण्याचं काम सुरु आहे. बेड्स, मेडीसम, ऑक्सिजन याबाबत चर्चा सुरु आहे. कुठे काय उणिव आहे त्याबाबत व्यापक चर्चा झाली. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जात नाही तर अधिक निर्बंध करुन गर्दी कशी टाळली जाईल याबाबत चर्चा झाली. निर्बंधावर योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे.
लॉकडाऊन हा शब्द न वापरता निर्बंध लावले आहेत. सरकारी कार्यालये वर्क फ्रॉम होम केले आहेत. नाईट कर्फ्यू लावले आहेत. निर्बंध लावल्यानंतर गर्दी वाढतेय. त्यामुळे कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत बारकारने निर्णय घेण्याबाबत चर्चा सुरु आहे. लोकांनी काही दिवस नियमांचं पालन केलं तर लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. ज्यावेळी संसाधनं संपतात त्यावेळी चैन ब्रेक करण्यासाठी तातडीचा इलाज हा लॉकडाऊन असतो. लोक स्वयंशिस्त पाळत नसल्याने निर्बंध कडक करावे लागत आहेत.
लोकलबाबत नियमावली जाहीर होईल
लोकलबाबतही आढावा घेतलेला आहे. त्याही बाबतही काही गाईडलाईन्स जाहीर होतील. कसं राहावं याबाबत सूचना दिल्याल जातील. कोणत्याही परिस्थितीत संसर्ग टाळावे. महाराष्ट्रात आरोग्याची व्यवस्था ठीक आहे. काही उणिवा आहेत. त्याबाबतच निर्णय घेतला जातोय.
गरिबांची लूट थांबवणे, उपचारपद्धती नव्याने ठरवण्याची गरज
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची बैठक पार पडली. या बैठकीत टोपे यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात कोरोना रुग्णांवर एका ठाराविक पद्धतीने उपचार सुरु आहे. मात्र आता कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. त्याचबरोबर रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेनही आढळून येत आहे. अशावेळी रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराची पद्धत नव्याने ठरवण्याची गरज असल्याचा मुद्दा आरोग्यमंत्री टोपे यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांवरील उपचाराची पद्धत काहीशी बदलली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज्य सरकार सध्या ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंटवर भर देत आहे. अशावेळी कोरोनाची कुठलिही लक्षणं आढळल्यास कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन सरकारकडून केलं जातं. तसंच कोरोना रुग्णांच्या संपर्कातील लोकांनीही कोरोना चाचणी करुन घेण्याच्या सूचना केल्या जातात. पण राज्यात अनेक ठिकाणी कोरोना चाचणीसाठी गरीबांची मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे. गरीबांची होणारी ही लूट थांबवण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची विनंतीही राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी बंद ठेवायचे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनाने चालत होते. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर अहवाल आणून निर्णय घेण्याचं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. पुण्यात जो निर्णय झाला तो वरिष्ठ स्तरावर चर्चा करुन निर्णय घेतला. पुण्यात निर्बंध लावणं गरजेचं होतं. पण तसे सर्वदूर लावले असं नाही. कोणत्या जिल्ह्यात निर्बंध लावले पाहिजेत, तेही महत्त्वाचं आहे. देशातील टॉप आठ जिल्हे हे महाराष्ट्रातील आहेत, असंही आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले.