मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचे ट्विटमधूनच प्रत्युत्तर
मुंबई : सध्या सोशल मीडियावर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या ट्विटची चर्चा आहे. नवाब मलिकांनी कोंबडीला मांजरीचा चेहरा मॉर्फ करुन पेहचान कौन? असे म्हणत नितेश राणे यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता नितेश राणेंने देखील मलिकांना ट्विटच्या भाषेत प्रत्युत्तर देत एका डुक्कराचा फोटो मॉर्फ करत ही प्रजाती फक्त भंगारात आढळते. पेहचान कौन? असे म्हणत प्रत्युत्तर दिलेय. त्यामुळे नवाब मलिक आणि नितेश राणे यांच्यातील हे ट्विटर वॉर आणखी पेटण्याची शक्यता आहे.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंना सभागृहात जाताना विधीमंडळाच्या पायऱ्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी म्याव म्याव आवाज करत चिवडण्यात आले. त्यानंतर राजकीय नेत्यांनी एकमेकांवर टीक करायला सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी महाविकास आघाडी सरकारकडून नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. फोटोमध्ये शरीर कोंबड्याचे होते तर चेहरा मांजरीचा होता. मलिकांनी एका कोंबड्याला मांजराचा फोटो मॉर्फ केला आणि पेहचान कौन ? असा खोचक सवाल केला. मलिकांना शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंनी उत्तर देत डुक्कराचा फोटो मॉर्फ केला. फोटोमागे भंगारही दिसत आहे. हा फोटो शेअर करुन मलिकांना प्रत्युत्तर देत ही प्रजाती फक्त भंगारात आढळते? ओळखा पाहू कोण असे कॅप्शन दिले आहे. अतिशय हिणकस पद्धतीने एकमेकांवर टीका करताना राजकीय नेते महाराष्ट्राची राजकीय आणि परंपरा विसरले आहेत का? असा प्रश्न सर्वस्तरातून विचारण्यात येत आहे.