Top Newsराजकारण

रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात; कृषीमंत्री तोमर यांचे संकेत

नागपूर : शेतकरी व शेतीक्षेत्राच्या विकासासाठी स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सरकारने कृषी कायदे आणले होते. केंद्र सरकारला नाइलाजाने ते मागे घ्यावे लागले; परंतु ‘सरकार निराश नाही. आम्ही एक पाऊल मागे हटलो आहोत. पुन्हा दोन पावले पुढे जाऊ, असे सांगून ते तिन्ही कृषी कायदे भविष्यात परत येऊ शकतात, असे संकेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले आहे.

रेशीमबाग मैदान येथे आयोजित अ‍ॅग्रो व्हिजनचा उद्घाटनाचा कार्यक्रम कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तोमर बोलत होते. ते म्हणाले स्वातंत्र्यानंतर कृषी क्षेत्रात खूप काम झाले. परंतु खासगी गुंतवणूक झाली नाही. इतर क्षेत्रात खासगी गुंतवणूक आली. त्याचे फायदेही त्या त्या क्षेत्राला मिळाले. परंतु कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक न झाल्याने तितका फायदा कृषी क्षेत्राला मिळू शकला नाही, असे ते म्हणाले.

जी काही गुंतवणूक झाली ती केवळ सरकारने केली. पायाभूत विकास झाला तो सुद्धा शहर, तालुका स्तरावर झाला. मात्र, गावपातळीवर शेतकऱ्यांच्या त्याचा काहीही लाभ मिळू शकला नाही. गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु काही लोकांना ते पटले नाही, केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी एक पाऊल पुढे येऊ असे म्हणत, भविष्यात मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा परत येऊ शकतात असे संकेत त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button