‘रेमडेसिवीर’ ‘लाईफ सेव्हिंग’ नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गंभीर रुग्णांना वाचवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रेमडेसिवीरच्या वापराबाबत मोठा गैरसमज दूर केला आहे. रेमडेसिवीर हे कोरोना रुग्णांवर उपचारासाठी महत्वाचे इंजेक्शन आहे, परंतु ते ‘लाईफ सेव्हिंग’ नाही. रेमडेसिवीरचा वापर फक्त रुग्णालयाच्या निर्देशानुसारच करणे गरजेचे आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रेमडेसिवीर हे उपचारासाठी प्रायोगिक इंजेक्शन आहे. त्याचा वापर केवळ आपत्कालीन स्थितीत व्हावा.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा गरज नसताना वापर करू नये. आतापर्यंत हे पूर्णतः सिद्ध झालेले नाही. की रेमडेसिवीर कोरोना रुग्णांच्या बचावासाठी उपयुक्त आहे. थोडक्यात रेमडेसिवीर सरसकट सर्व कोरोना रुग्णांसाठी गरजेचं नाही. कोरोना संसर्गामुळे जास्त आजारी आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसिवीरचा वापर करता येईल. घरी आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांवर कोणत्याही परिस्थितीत रेमडेसिवीरचा वापर करण्यात येऊ नये. या इंजेक्शनचा वापर फक्त रुग्णालयीन यंत्रणेतच करावा.