अर्थ-उद्योग

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सच्या मुख्यालयाचे अहमदाबादमध्ये स्थलांतर

मुंबई : मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज) आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मॅनेजमेंट हाती आल्यानंतर काही दिवसांतच अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) नं नेतृत्वात मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी आर. के. जैन यांच्याकडे देण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रोजेक्ट मिळवण्यातही त्यांचं मोठं योगदान असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.याशिवाय अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) नं आपलं मुख्यालयही दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

अदानी समुह अतिशय वेगानं प्रगती करत आहे. यासोबतच हा निर्णय घेण्यात आला आहे की अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सचं मुख्यालय आता मुंबई ऐवजी गुजरातमध्ये असेल, असं अदानी समुहानं एका प्रेस रिलिजद्वारे सांगितलं. हा निर्णय आम्हाला सर्वांच्या सहयोगानं वेगानं निर्णय घेण्यासाठी मदत करेल, जे या कालावधीत सर्वात महत्त्वाचं आहे, असंही त्यात नमूद करण्यात आलं आहे.

आर.के.जैन यांच्यापूर्वी बेहना जंदी हे सीईओ एअरपोर्ट्स होते. आता त्यांच्याकडे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्समध्ये नॉन एअरो डिपार्टमेंटच्या सीईओपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडमध्ये आर के जैन यांच्या जागी प्रकाश तुल्सियानी यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते सध्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग्समध्ये ऑपरेशनल प्रेसिडेंट आहेत. १३ जुलै रोजी अडाणी समूहाची सब्सिडायरी कंपनी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं जीव्हीके ग्रुप कडून मुंबई विमानतळाच्या मॅनेजमेंटची जबाबदारी आपल्या हाती घेतली होती. सध्या अदानी समुहाकडे देशातील एकूण सात विमानतळांचं मॅनेजमेंट हाती आलं आहे. मुंबईशिवाय कंपनीकडे गुवाहटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरू, जयपूर आणि तिरुवनंतरपुरम या विमानतळांची जबाबदारी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button