रिलायन्स इंडस्ट्रिजची सोलार एनर्जीच्या क्षेत्रात मोठी झेप
आरईसी सोलार होल्डिंग्सची ५७९२ कोटी रुपयांत खरेदी
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) नियंत्रण असलेली सहायक कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (आरएनईएसएल) चायना नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनी लिमिटेडकडून, आरईसी सोलार होल्डिंग्स एएस (आरईसी ग्रुप)च्या १०० टक्के भागिदारीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजचा सोलार एनर्जीच्या क्षेत्रात हा एक मोठा व्यवहार आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलारने रविवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी ५७९२ कोटी रुपयांत आरईसी सोलर होल्डिंग्सचे अधिग्रहण केले आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) कंट्रोल असलेली सहायक कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडने (आरएनईएसएल) चायना नॅशनल ब्लूस्टार (ग्रुप) कंपनी लिमिटेडकडून, आरईसी सोलार होल्डिंग्स एएस (आरईसी ग्रुप)च्या १०० टक्के भागिदारीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलारने बीएसई फायलिंगमध्ये ही माहिती दिली.
जागतिक स्तरावर फोटोव्होल्टिक (पीव्ही) मॅन्युफॅक्चरिंग प्लेयर बनण्यासाठी रिलायन्सच्या न्यू एनर्जी व्हिजनसाठी हे अधिग्रहण अत्यंत महत्वाचे आहे. हे अधिग्रहण रिलायन्स ग्रुपला २०३० पर्यंत सोलर एनर्जीचे १०० गीगाव्हॅट उत्पादनाचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल. भारताचेही याच वर्षापर्यंत रिन्यूएबल एनर्जीचे ४५० गीगाव्हॅट उत्पादनाचे लक्ष आहे.
नॉर्वेमध्ये १९९६ साली आरईसी सोलार होल्डिंग्स एएसची स्थापना झाली होती. याचे मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे. याच बरोबर उत्तर अमेरिका, यूरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशिया प्रशांतमध्ये या ग्रुपचे विभागीय केंद्र आहेत. या कंपनीकडे ६०० हून अधिक युटिलिटी आणि डिझाइन पेटंट्स आहेत. यापैकी ४४६ ला मंजुरी मिळाली आहे. आरईसी सोलार होल्डिंग्स एएस प्रामुख्याने संशोधन आणि विकास यावर लक्ष केंद्रित करते.