आरोग्य
कोरोना रूग्णसंख्येचा विक्रमी आकडा; देशात एका दिवसात ४ लाख १ हजार ९९३ नवे रुग्ण
नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीला सुरूवात झाल्यापासून देशात पहिल्यांदाच कोरोना रूग्णांची विक्रमी आकडेवारी शनिवारी नोंदवण्यात आली. देशात ४ लाख १ हजार ९९३ कोरोना रूग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ३५२३ रूग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची आकडेवारी केंद्रीय सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यासोबतच देशात जवळपास ३ लाख कोरोना रूग्णांनी कोरोनावर मात केल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णसंख्या वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे.
भारतात तीन लाख रूग्ण गेल्या २४ तासात कोरोनामुक्त झाले असले तरीही अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ही ३२ लाख ६८ हजार ७१० इतकी आहे. देशात आता कोरोना संक्रमित झालेल्या रूग्णांची आकडेवारी १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे.