राजकारण

मदत करण्यास तयार, पण राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा सक्षम करावी : फडणवीस

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील अधिक सतर्क झाली आहे. आम्ही या परिस्थितीत राज्य सरकारला मदत करायला तयार आहोत जनता देखील तयार आहे. पण आताच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपूरी आहे. त्यामुळे राज्य सरकारला आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. असं वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. नव्या स्ट्रेनबद्दल सरकारकडून प्रबोधन होत नसल्यचं देखील फडणवीस म्हणाले. राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी पाहिजे तिथे सहकार्य करावे, असेही ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. पण बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. सरकारने अधिक चर्चा करून सर्व गोष्टींचा पुरवठा कसा वाढवता येईल याचा विचार करून चर्चा केली पाहिजे. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंट सोबतच लसीकरण या गोष्टी किती वेगाने करता येतील याकडे राज्य सरकारने लक्ष दिलं पाहिजे. राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे असे आम्ही आवाहन करतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

राज्य सरकारने सक्तीची कारवाई करून 4 ते 5 हजार कोटी रूपये वीज ग्राहकांकडून जमवलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आताची परिस्थिती पाहाता वीज कनेक्शन कापनं बंद केलं पाहिजे. सध्या राज्यात लॉकडाऊन, मिनी लॉकडाऊन, कडक निर्बंध सुरू होत आहे. त्यामुळे लोकांच्या रोजगारावर मोठा परिणाम होणार आहे. म्हणून वीज कनेक्शन कापण्याचा निर्णय मागे घ्यायला हवा.

राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी दरवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याचाही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. केंद्राने राज्याला भरपूर मदत केली असून मी यापूर्वीच त्याची सविस्तर माहिती दिली असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button