आरोग्य
रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी आणि ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती. इतके दिवस त्या घरीच विलगीकरणात (Home isolation) होत्या. पण मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. रश्मी ठाकरे यांना दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यात 23 मार्चला रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना 20 तारखेला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. रश्मी ठाकरे यांनी थोडे दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव यांच्याबरोबर कोरोनाची लससुद्धा घेतली होती.