Top Newsआरोग्य

‘जुलाई आ गया, वैक्सीन नहीं आयी’; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना लस नसल्याबाबत त्यांनी शुक्रवारी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले की, जुलै आला आहे, मात्र कोरोना लस आली नाही. यापूर्वी राहुल गांधी यांनीही कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या भरपाईच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर लक्ष्य केले होते. दुसरीकडे, केंद्राने हे स्पष्ट केले आहे की, जुलैमध्ये साधारण १२ कोटी डोस विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात येतील. यासह, लसीकरण मोहीम आणखी वेगाने करण्यात येणार आहे.

यापूर्वी केंद्राकडून देण्यात आलेल्या मदत पॅकेजवर राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधाला होता. त्यावेळी ते म्हणाले, कोणतेही कुटुंब अर्थमंत्र्यांचे आर्थिक पॅकेजमधून राहण्यास, अन्न, वैद्यकीय बिले, शाळेच्या फीवर खर्च करू शकत नाही. हे आर्थिक पॅकेज नाही, तर आणखी एक फसवणूक आहे. सीतारामन यांनी ६,२८,९९३ कोटी रुपयांच्या आठ मदत उपायांची घोषणा केल्यावर एक दिवसानंतर त्यांचे हे भाष्य करण्यात आले आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले की, पेट्रोल-डिझेल कर संकलनातील थोड्या भागाची भरपाई कोविड पीडित कुटुंबियांना दिली जाऊ शकते – ही त्यांची गरज आहे. मोदी सरकारने आपत्तीतील जनतेला मदत करण्यापासून मागे हटू नये.

आरोग्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी असे म्हटले आहे की जुलै महिन्यासाठी कोरोना लसीचा पुरवठा करण्याबाबत राज्यांना आधीच कळविण्यात आले आहे. या महिन्यात एकूण १२ कोटी डोस दिले जातील. दिवसागणिक पुरवठ्यासह १५ दिवसांपूर्वी ही माहिती राज्यांना देण्यात आली आहे. राहुल गांधींच्या ट्विटनंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. एक दिवस अगोदर जुलै महिन्यात लस उपलब्ध झाल्याची माहिती त्यांनी आधीच दिली असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. राहुल गांधींची अडचण काय आहे, ते वाचत नाही का? अहंकार आणि अज्ञानाची कोणतीही लस नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button