राजकारण

पोलीस दलातील बदल्यांमधील रॅकेट, पैशांची दलाली धक्कादायक : फडणवीस

नागपूर : मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. जेवढ्या गाड्या जप्त झाल्या त्या गाड्या कोण कोण वापरत होत याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. भाजपने आज पासून आंदोलन सुरू केलं ते आंदोलन जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि गृहमंत्र्यांच्या राजीनामा होत नाही तोपर्यंत सुरू राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे की, या दलालीचा खुलासा करणारे परमबीर सिंह हे पहिले व्यक्ती नाहीत. महाराष्ट्राचे माजी डीजी सुबोध जयस्वाल यांनी राज्य सरकारला एक अहवाल सादर केला होता. पोलीस दलातील बदल्यांमधील रॅकेट, पैशांची दलाली या संदर्भातले संपूर्ण एक रिपोर्ट पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता. हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला नंतर गृहमंत्र्यांकडे गेला. पण त्या अहवालावर कोणतीही कारवाई झाली नाही. या अहवालावर कारवाई न झाल्यामुळे सुबोध जयस्वाल महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक पद सोडून केंद्रीय सेवेत दाखल झाले आहेत. हे कारण अत्यंत धक्कादायक आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी फडणवीस यांनी असे म्हटले आहे की, शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यांनी बनवलेल्या सरकारला पाठिवशी घालावं लागतं, त्यांची गोष्ट मी समजू शकतो. शरद पवार सांगतात ते अर्धसत्य आहे. परमबीर सिंह यांच्या कमिटीनं सचिन वाझे यांना पदावर घेतलं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानं आणि निर्देशानुसार झाली. अँटिलिया प्रकरणात सचिन वाझेंच्या अटकेनंतर विविध खुलासे झाले आहेत. माजी पोलीस आयुक्त व राज्याचे पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेला खुलासा धक्कादायक आहे. जेवढ्या गाड्या जप्त झाल्या त्या गाड्या कोण कोण वापरत होत याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. भाजपने आज पासून आंदोलन सुरू केलं ते आंदोलन जो पर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि गृहमंत्र्यांच्या राजीनामा होत नाही तो पर्यंत सुरू राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सचिन वाझे यांच्या अटक नंतर वेगवेगळे खुलासे होत आहेत. परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून धक्कादायक खुलासा झाला आहे. या आधी सुद्धा असे खुलासे झाले आहेत. सुबोध जैस्वाल यांनी केंद्रात जाताना मुख्यमंत्र्यांना रिपोर्ट दिला होता. सुबोध जैस्वाल यांनी सादर केलेल्या रिपोर्टवर कारवाई झाली नाही. सुबोध जैस्वाल आणि रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालावर कारवाई केली असती तर आज ही वेळ आली नसती. यानंतर या प्रकरणात महाराष्ट्रातले इंटेलिजंस अहवाल सादर करण्यात आला. याबाबत वारंवार गृहमंत्र्यांना ऑफिसर कमिश्नर इंटेलिजंस रश्मी शुक्ला यांनी सांगितले. शुक्ला यांनी काही परवानग्या घेऊन काही फोन टॅप केले. या फोनचा अहवाल करण्यात आला यामध्ये धक्कादायक खुलासा झाला. याचा रिपोर्ट रश्मी शुक्ला यांनी गृहमंत्र्यांना दिला परंतु या अहवालावर कारवाई न होता. रश्नि शुक्ला यांच्यावर कारवाई झाली होती. त्यांना पदावरुन बाजूला करण्यात आले. ज्यांचे रिपोर्टमध्ये नाव आले त्यांना पदस्थापना मिळाली. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेला आरोप हा पहिला आरोप नाही असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button