क्वेस्ट ग्लोबल : भारतातील ग्रेट प्लेस टू वर्क – प्रमाणित कंपनी
बेंगळुरू, : क्वेस्ट ग्लोबल या जागतिक प्रोडक्ट इंजिनीअरिंग सेवा कंपनीला प्रतिष्ठेचे, ग्रेट प्लेस टू वर्क हे प्रमाणन, भारतात प्राप्त झाले आहे. कंपनीने ही घोषणा केली. क्वेस्टने, कंपनीमध्ये विश्वासाची तसेच उच्च कामगिरीला प्रोत्साहन देणारी संस्कृती निर्माण केली व ती टिकवून ठेवली, यावर या वार्षिक प्रमाणनामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.
ट्रस्ट इंडेक्सच्या ५ महत्त्वपूर्ण निकषांवर कंपनीने उत्तम कामगिरी केली. हे निकष म्हणजे विश्वासार्हता, आदर, न्याय्य धोरणे, अभिमान आणि सौहार्द. क्वेस्टने आपल्या मनुष्यबळामध्ये आपलेपणाची भावना, आत्मविश्वास आणि कंपनीप्रती विश्वास देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी अविश्रांतपणे काम केले आहे. क्वेस्टचे कर्मचारी आहोत, याचा अभिमान क्वेस्ट कर्मचाऱ्यांना वाटतो. व्यावसायिक वाढीसोबतच प्रत्येक कर्मचाऱ्याचे आरोग्य, सुरक्षितता व कल्याण यांना प्राधान्य देणारे कार्यस्थळ निर्माण करण्याप्रती कंपनी बांधील आहे आणि कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनावर दाखवलेल्या विश्वासातून हे खऱ्या अर्थाने दिसून येते.
क्वेस्ट ग्लोबलचे चीफ पीपल ऑफिसर निकेत सुंदर यावेळी म्हणाले, ही कंपनी आपली आहे अशी भावना कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण करणारा अनुभव व संस्कृती जोपासणे क्वेस्टच्या प्राधान्यक्रमावरील पहिल्या काही बाबींमध्ये आहे. गेल्या दोन वर्षांत संपूर्ण जग ज्या स्थितीतून गेले ते बघता, ग्रेट प्लेस टू वर्क हे प्रमाणपत्र मिळवणे खूपच अभिमानास्पद यश आहे. आम्ही समर्पित वृत्तीने निर्माण केलेल्या आणि सातत्याने जपलेल्या संस्कृतीबद्दल हे यश खूप काही सांगते. अर्थात, आम्हाला थांबून चालणार नाही आम्ही सातत्याने आमच्या मर्यादा ओलांडत राहू, अधिकच्या दिशेने वाटचाल करत राहू, उत्क्रांत होत राहू आणि एक शतकी कंपनी उभारण्याचे उद्दिष्ट अधिक दृढ करत राहू.
ग्रेट प्लेस टू वर्क हे कार्यस्थळ संस्कृतीबाबतचे जागतिक स्तरावरील अधिकारी प्रमाणन आहे. १९९२ पासून त्यांनी जगभरातील १०० दशलक्षांहून अधिक कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले आहे आणि या सखोल माहितीचा उपयोग करून उत्तम कार्यस्थळाची संकल्पना विकसित केली आहे. यामध्ये सर्वाधिक महत्त्व विश्वासाला आहे. त्यांच्या कर्मचारी सर्वेक्षण प्लॅटफॉर्मने नेतृत्वाची भूमिका निभावणाऱ्यांना फीडबॅक, रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि मनुष्यबळाबाबतचे धोरणात्मक निर्णय करण्यासाठी लागणारी महत्त्वपूर्ण माहिती पुरवली आहे. ही संस्था ६० हून अधिक देशांतील व्यवसाय, ना-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्था व सरकारी यंत्रणांना सेवा देते आणि गेल्या तीन दशकांपासून उत्तम कार्यस्थळाच्या वैशिष्ट्यांबाबत आद्य म्हणावे, असे संशोधन संस्था करत आहे.
भारतात ही संस्था दरवर्षी २२ उद्योगक्षेत्रांतील ११०० हून अधिक कंपन्यांसोबत काम करते आणि त्यांना उच्च विश्वासाची व उच्च कामगिरीला प्रोत्साहन देणारी तसेच शाश्वत व्यावसायिक निष्पत्ती देणारी संस्कृती™ विकसित करण्यात मदत करते. भारतीय उद्योगक्षेत्रातील शेकडो सीईओ आणि सीएक्सओ ग्रेट प्लेस टू वर्क कम्युनिटीचा भाग आहेत. भारताला सर्वांकरिता काम करण्यासाठी उत्तम स्थळ म्हणून विकसित करण्याप्रती ही संस्था बांधील आहे.
या संस्थेच्या संशोधनातून असे दिसते की, काम करण्यासाठी उत्तम स्थळांची काही वैशिष्ट्ये आहेत. उत्तम नेतृत्व, कर्मचारी अनुभवातील सातत्य आणि शाश्वत आर्थिक कामगिरी ही वैशिष्ट्ये यात महत्त्वाची आहेत. अशा कंपन्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना, मग त्यांची भूमिका, लिंग, कार्यकाळ किंवा कंपनीतील स्तर कोणताही असो, सातत्यपूर्ण अनुभव देऊ शकतात. अशा कंपन्यांचे नेते ‘सर्वांना काम करण्यासाठी उत्तम स्थळ’ निर्माण करण्याच्या तसेच ते टिकवण्याच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे असतात आणि ‘सर्वांसाठीचे नेते’ म्हणून आपला आदर्श ठेवतात. अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या- https://www.greatplacetowork.in/