क्वेस्ट ग्लोबलकडून इंजिनीअरिंग इनोव्हेशन स्पर्धेच्या अंतिम फेरीतील टॉप १० स्पर्धकांची यादी जाहीर
नवी दिल्ली : : क्वेस्ट ग्लोबल (QuEST Global) या जागतिक प्रोडक्ट इंजिनीअरिंग सर्व्हिस कंपनीने आपली इंजिनीअरिंग इनोव्हेशन स्पर्धा, ‘इन्जेनियम’च्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या टॉप १० स्पर्धकांची घोषणा केली आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नवसंकल्पनांची निर्मिती करण्याच्या उर्मीला तसेच उद्योजकतेसाठी आवश्यक विचारपद्धतीला खतपाणी देणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. इन्जेनियमच्या माध्यमातून युवा प्रतिभावान अभियंत्यांना आपले अभियांत्रिकीचे कौशल्य ख-याखु-या जगातील प्रश्न सोडविण्याची संधी देणारा एक मंच क्वेस्टकडून उपलब्ध करून दिला जात आहे.
गेल्या १० वर्षांपासून इंजेनियमने भारतातील अभियांत्रिकीच्या अनेक प्रतिभावान विद्यार्थ्यांना यशस्वीपणे शोधून काढले आहे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे प्रयोग करण्यास उत्सुक समविचारी व्यक्तींच्या एका मंचासमोर आपले स्वप्न साकार करण्यास त्यांची मदत केली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी खुली असणारी ही उद्योगक्षेत्र-शिक्षणक्षेत्र यांच्यामध्ये संवादाचा पूल उभारत आणि “इंडस्ट्री-रेडी“ अर्थात आपल्या उद्योगक्षेत्रात उतरण्यासाठी सज्ज व्यावसायिक तयार करत स्पर्धा उद्योगक्षेत्र आणि शैक्षणिक संस्था यांच्या गरजांमध्ये संगती साधण्यावर भर देते. निवडलेल्या प्रकल्पांतून पुढे येणा-या संकल्पना आपल्या जगण्याच्या, काम करण्याच्या, प्रवास करण्याच्या आणि इतरांशी संवाद साधण्याच्या पद्धतीमध्ये सुधारण घडवून आणणा-या नाविन्यपूर्ण उपाययोजना मांडणा-या असतात.
अंतिम फेरीत पोहोचलेल्या १० स्पर्धकांना त्यांच्या संकल्पनांमध्ये सुधारण घडवून आणता यावी आणि अंतिम सोहळ्यामध्ये यशस्वी होण्याच्या दिशेने काम करता यावे यासाठी क्वेस्टद्वारे त्यांना उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून दिले जातात. यावर्षीच्या फायनलिस्ट्समध्ये पी. ई. एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (पीईएसआयटी), एमव्हीजे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (एमव्हीजेसीई), सीएमआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, पी. ई. एस. कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पीईएससीई), आणि पीईएस युनिव्हर्सिटी ऑफ कर्नाटक या संस्थांमधील टीम्सचा समावेश आहे. यात केरळातील आदी शंकरा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नोलॉजी आणि अमल ज्योती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (एजेसीई), महाराष्ट्रातील जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, उत्तर प्रदेशमधील बेनेट युनिव्हर्सिटी आणि तामिळनाडूमधील टेक युनिव्हर्सिटीच्या पथकांचाही समावेश आहे. इन्जेनियम स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२२ रोजी संध्याकाळी ५.१५ वाजता होणा-या व्हर्च्युअल सोहळ्यामध्ये जाहीर केली जातील.
या घोषणेविषयी बोलताना क्वेस्ट ग्लोबलच्या डिलिव्हरी विभागाचे ग्लोबल हेड श्रीकांत नाईक म्हणाले, “डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग सेवांचा अधिक सुरक्षित आणि स्मार्ट जग उभारण्यासाठी वापर करून घेत इंजिनीअरिंगच्या भविष्याला दिशा देण्याचे काम क्वेस्टद्वारे केले जात आहे. उद्याच्या या सक्षम युवा अभियंत्यांवरच भविष्य अवलंबून आहे हे आपल्याला माहीत आहे आणि त्यांना पाठबळ देत असल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. क्वेस्ट इंजेनियम हे उद्योगक्षेत्र-शिक्षणक्षेत्र यांच्या संघटित प्रयत्नांचे एक अप्रतिम उदाहरण आहे, जिथे नाविन्यपूर्ण संकल्पना आणि उद्योजकतेच्या विचारसरणीला चालना दिली जात आहे. क्वेस्टमध्ये लोकांमधली गुंतवणूक हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे आणि इंजेनियम प्रोग्रामच्या माध्यमातून हीच उर्मी अधिक व्यापक पातळीवर प्रसारित करत असल्याचा आम्हाला आनंद आहे. स्पर्धेचा एकेक टप्पा पार करताना विद्यार्थ्यांच्या टीम्सकडून मोठी कामे उभारली जात असलेले पाहण्यास मी उत्सुक आहे.“
इंजेनियम ही स्पर्धा नाविन्यपूर्ण संकल्पनां मांडण्याच्या संस्कृतीची जोपासना करणे आणि अभियंत्यांच्या मनावर उद्योजकतेची विचारसरणी बिंबवणे या कामी क्वेस्टच्या ध्यासाशी पुरेपूर सुसंगती साधणारी आहे. उद्योगक्षेत्र-शिक्षणक्षेत्र यांच्यातील दरी सांधण्यासाठी आणि उद्योगक्षेत्राला जाणवणारी कुशलतेची कमतरता भरून काढण्यास मदत करणा-या कुशल मनुष्यबळाचा मोठा साठा निर्माण करण्यासाठी क्वेस्टच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभवसिद्धतेचा वापर या मंचावरून यशस्वीपणे केला जातो.