मुंबईपाठोपाठ ठाण्यातही मालमत्ता कर माफ होणार : महापौर म्हस्के
ठाणे – मुंबई पाठोपाठ ठाणे महानगरपालिका हद्दीतील ५०० चौरस फूट घरांच्या कर माफीचा निर्णय लवकरच होणार असून त्या पद्धतीच्या हालचालींना वेग आला आहे. ठाणे महापालिकेच्या मागील महासभेत कारमाफीचा प्रस्ताव मंजूर झाला असून हा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला आहे, प्रशासकीय तपासण्यासाठी त्यावर काम सुरु असून लवकरच मुंबई प्रमाणे ठाण्यात कारमाफीचे घोषणा करण्यात येणार असल्याचे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने ठाणेकरांना ५०० चौरस फूट घरांना करमाफी देणार असे वचन दिले होते. त्यानुसार ठाणे महापलिकेची तयारी पूर्ण झाली आहे. आता त्या वचनाची पूर्तता करण्यात येणार असून, महानगरपालिकेच्या ठरावानुसार पालिकेच्या नियमात बदल करून त्यावर मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येईल व राज्यपाल यांच्याकडे पाठवले जाईल असे देखील म्हस्के यांनी यावेळी सांगितले.
कोरोना काळात महापलिकेचे आर्थिक परिस्थिती ढासळली असून करमाफीमुळे पालिकेच्या तिजोरीवर आणखी ताण येणार आहे. मालमत्ता कर हा महापलिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असून या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत या करापोटी कोटी रुपये जमा होतात. ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी दिली तर वर्षाकाठी पालिकेच्या तिजोरीत सुमारे १५० कोटी रुपये तूट येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान करमाफीमुळे कोविड काळात ठाणेकरांना नवीन वर्षात दिलासा मिळणार आहे.
पालिकेच्या मागील निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिले होते, मात्र या निर्णयाला तब्बल ४ वर्ष उलटली असल्याने अनेकवेळा विरोधक आक्रमक होताना दिसून आले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना लवकरच कारमाफीचे घोषणा करणार असून या निर्णयाचे सर्वांनी स्वागत करावे, विरोधकांनी निव्वळ टीका करण्यास सुरुवात करू नये असे महापौर म्हस्के यांनी यावेळी सांगितले.