Top Newsराजकारण

यहाँ के हम सिकन्दर! ‘ट्विटर’वर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कायम

नवी दिल्ली: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर लोकप्रिय नेते आहेत. सोशल मीडियामध्ये नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला ७ कोटी यूजर्सने फॉलो केले आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मोदी यांनी २००९ मध्ये ट्विटर अकाऊंट वापरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. २०१० मध्ये त्यांचे एक लाख फॉलोअर्स होते. तर, २०११ मध्ये त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ४ लाखांपर्यंत पोहोचली होती.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाउंट निलंबित झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचे नाव लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी आले. मात्र नरेंद्र मोदींच्या आधी हे शीर्षक डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर नोंदले गेले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक अकाऊंटला ८८.७ मिलियन म्हणजेच ८ कोटी ८७ लाख लोक फॉलो करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर होते. नरेंद्र मोदींना ६४.७ मिलियन म्हणजेच ६ कोटी ४७ लाख लोक फॉलो करत होते. आता फॉलोअर्सची ही संख्या वाढून ७० मिलियन म्हणजे ७ कोटी झाली आहे.

याआधी २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान ट्विटर, यूट्यूब, गूगल सर्चवर ट्रेडिंग चार्टमध्ये अव्वल होते. अशात एका स्टडीनुसार, या काळात त्याचे ब्रँड व्हॅल्यू सुमारे ३३६ कोटी रुपये होते. हे ब्रँड मूल्य सोशल मीडिया एंगेजमेंट आणि फॉलोअर्सच्या आधारावर तयार करण्यात येते.

राहुल गांधी यांचे १९.४ मिलियन फॉलोअर्स

काँग्रेस नेते राहुल गांधीयांचे ट्विटरवर १९.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. राहुल गांधी यांच्यापेक्षा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे फॉलोअर्स जास्त आहे. त्यांचे ट्विटरवर २६.२ मिलियन फॉलोअर्स आहेत. याव्यतिरिक्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विटर २२.८ मिलियन फॉलोअर्स आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button