राजकारण

मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक टाळण्यासाठी प्रताप सरनाईक यांची हायकोर्टात धाव

मुंबई : मनी लॉड्रिंगप्रकरणी अटकेपासून संरक्षण मिळावं म्हणून शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक, त्यांची मुलं विहंग आणि पुर्वेश आणि नातेवाईक योगेश चांदेगाला यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेडप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाल(ईडी)नं हे प्रकरण न्यायप्रविष्ट असेपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात यावर्षी एप्रिल महिन्यात विकासक योगेश देशमुखला अटक करण्यात झाली होती. सुमारे ५,५०० कोटींच्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित हे प्रकरण आहे. त्यातच देशमुख हे प्रताप सरनाईक यांचे निटकवर्तीय असल्याचे सांगत ईडी आता त्यांच्या मागावर असून सरनाईक गायब असल्याचा दावा भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी समाज माध्यमावरून केला होता. ‘आस्था ग्रुप’ या काळ्या यादीतील कंपनीसोबत एनएसईएलमध्ये २५० कोटींची अफरातफर केल्याचा आरोप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपवर ठेवण्यात आला आहे. विहंग आणि आस्था ग्रुप यांना संयक्त विद्यमाने विहंग हाऊंसिग प्रोजेक्ट नावाने प्रकल्प सुरू केला. आणि त्यातंर्गत विकासक देशमुख यांच्या मदतीने टिटवाळा येथील अनेक जमिनी खरेदी केल्या. त्यातील काही जमिनी खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली. सुरूवातीला २२ कोटींची फसवणूक समोर आली. त्यात एक कोटी शेतक-याला देण्यात आले. त्यात सरनाईक यांनी १२ तर उर्वरीत १० कोटी देशमुख यांच्या खात्यात वळविण्यात आल्याचं निदर्शनास आलंय.

साल २०१४ मध्ये ईडीने टिटवाळ्यातील हा भूखंड जप्त करून प्राधिकरणाकडून भूखंड जप्तीची पुष्टी केली होती. तसेच या जागेचा कोणताही व्यवहार होऊ नये, म्हणून ईडीने स्थानिक महसूल प्राधिकरणास जप्तीबाबत माहिती दिली होती. मात्र, जानेवारी महिन्यात सरनाईक यांच्या मदतीने विकासक देशमुख यांनी ईडीनं जप्त केलेला भूंखड व्रिकीसाठी काढल्याची बाब निदर्शानस आली आणि ईडीने याप्रकरणी तपास करण्यास सुरुवात केली. यापूर्वीही ईडीनं बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. टॉप्स ग्रुप या खासगी सिक्युरिटी फर्मशी संबंधित मनी लॉड्रींग प्रकरणात तूर्तास प्रताप सरनाईक, विहंग आणि योगेश यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button