राजकारण

प्रभाकर साईलचे पैशांसाठी वानखेडेंवर खोटे आरोप? भाजप नेत्याचा दावा

मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक नवा व्हिडिओ ट्विट करत आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे. रामजी गुप्ता नावाच्या व्यक्तीचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं असून यात प्रभाकर साईल यानं किरण गोसावीकडे पैशांची मागणी केली होती आणि त्यानं ते दिले नाहीत म्हणूनच प्रभाकर साईल आता आरोप करतोय, असं रामजी गुप्ता नावाचा व्यक्ती बोलत या व्हिडिओत बोलत असल्याचं मोहित कंबोज यांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणामागे मियाँ नवाब आणि मनोज यांचा हात असल्याचंही यात स्पष्टपणे ऐकू येत आहे.

मोहित कंबोज यांच्या दाव्यानुसार रामजी गुप्ता नावाच एक नोटरी करणारा व्यक्तीचं हे स्टिंग ऑपरेशन आहे. यात रामजी गुप्ता स्पष्टपणे म्हणतोय की, किरण गोसावीकडून प्रभाकर साईल यानं पैशांची मागणी केली होती. कारण प्रभाकर हा किरण गोसावी याचा बॉडीगार्ड होता. त्याला सोबत घेऊनच सारंकाही झालं होतं, असं या व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. दरम्यान, या स्टिंग ऑपरेशनची सत्यता अद्याप पडताळून पाहिली गेलेली नाही. पण या स्टिंग ऑपरेशनमुळे प्रभाकर साईलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button