इतर

पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार पी.के. सिन्हा यांचा राजीनामा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी. के. सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पी.के सिन्हा यांनी दिलेल्या राजीनाम्यामागे वैयक्तिक कारण असल्याचे स्पष्ट केले आहे. नृपेंद्र मिश्रा यांच्या राजीनाम्यानंतर २०१९ पासून पी.के सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुख्य सल्लागाराची जबाबदारी सांभाळत होते.

माजी कॅबिनेट सचिव पी.के सिन्हा यांची २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. सिन्हा यांची पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी (ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, या राजीनाम्याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

पी.के सिन्हा यांनी अलाहाबादमध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. २०१५ मध्ये केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव पी.के सिन्हा यांचा कार्यकाळ एका वर्षासाठी वाढविला होता. कॅबिनेट सेक्रेटरीचा कार्यकाळ हा साधारण दोन वर्षांचा असतो. यूपी केडरचे आयएएस अधिकारी पी.के सिन्हा पूर्वी ऊर्जा सचिव होते. १९७७-७८ बॅचच्या सचिवांमध्ये ते सीनियर होते आणि म्हणूनच त्यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांची कॅबिनेट सचिवपदी नेमणूक केली गेली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button