Top Newsराजकारण

काँग्रेसविरोधी आघाडीसाठी ममतादीदींना पवारांची साथ : फडणवीस

शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह; आशिष शेलारांची टीका

मुंबई: काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साथ आहे, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ममतादीदी काल मुंबईत आल्या. त्यांनी काही भेटीगाठी घेतल्या. या सर्व घडामोडींमध्ये एक लक्षात येतंय की काँग्रेसला बाजूला ठेवून नॉन काँग्रेस विरोधी पक्षांची एक अलायन्स करण्याचा प्रयत्न ममतादीदी करत आहेत. त्याला पवारांची साथ दिसत आहे. त्यावर काल काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आमच्याशिवाय कोणतीही आघाडी यशस्वी होऊ शकत नाही असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचा हा अंतर्गत सामना आहे. तो अंतर्गत सामना पूर्ण झाल्यावर आमच्याशी काय लढायचं ते ठरवतील, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना लगावला.

उद्योगांना आकृष्ट करणे हा ममता बॅनर्जीचा बहाणा आहे. या दौऱ्याचा मूळ अजेंडा राजकीय होता. २०२४ मध्ये मोदीच सत्तेत येतील हे सर्वांनी मान्य केलं आहे म्हणून त्यांना हरवण्यासाठी काय रणनीती करता येईल याबाबतची खलबते चालली आहेत. कसं एकत्र येता येईल? याचा विचार सुरू आहे. २०१९ मध्येही असे प्रयोग झाले होते. पण त्या प्रयोगांना यश आलं नाही. लोकांनी मोदीजींवर विश्वास ठेवला. २०२४ मध्येही मोदींवरच जनता विश्वास ठेवेल, असंही त्यांनी सांगितलं.

भाजप विरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन लढायचं असं म्हणत असताना पवार साहेब अंडर लाईन स्टेटमेंट करतात. त्यावेळी त्यांना काँग्रेस सोडून सर्व एकत्र या असं म्हणायचं असतं. तुम्ही एक लक्षात घ्या, ममता दीदी थेट बोलणाऱ्या आहेत. तर पवार साहेब बिटवीन द लाईन बोलणाऱ्या आहेत. दोघांचं बोलणं एकच आहे. दोघांना काँग्रेसला बाजूला ठेवायचं आहे. इतरांना सोबत घ्यायचं आहे. ममता दीदी गोव्यात आणि नॉर्थ ईस्टमध्ये का बरं लढत आहेत? एवढ्याचसाठी की त्यांना आतापर्यंत प्रिन्सिपल अपोझिशन काँग्रेस नाही आम्हीच आहोत हे सांगायचं आहे. काँग्रसे संपली आहे. आम्हीच खरी काँग्रेस आहोत हे त्यांच्या पक्षाचं स्टेटमेंटच आहे. त्या सर्व मताला पवारांचं समर्थन आहे. पवारांचं मत हे पहिल्या दिवसापासून आहे. फक्त राज्यातील परिस्थिती त्यांना अनुकूल नाहीये. त्यांना काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळेच ते काँग्रेससोबत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

यावेळी ममता बॅनर्जी, संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची भेट झाली. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कितीही गुप्त भेटी घ्या. २०२४ ला मोदींच्या नेतृत्वातच सरकार येणार आहे, असा दावा त्यांनी केला.

वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री नेहमीच मुंबईत येत असतात. हे काही पहिल्यांदा घडत नाही. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. देशभरातील उद्योजक मुंबईत राहतात. त्यामुळे देशातील मुख्यमंत्री उद्योजकांना अपिलही करत असतात. पण माझा अनुभव असा आहे की महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या मजबूत राज्य आहे. कोणी अपिल केलं म्हणजे राज्यातून उद्योग जातील असं नाही. पण राज्याने गाफील राहून चालणार नाही. आपण फार मोठे आहोत आणि कोणी बाहेर जाणार नाही असा विचार करत बसलो आणि दुसऱ्यांना सोयी सुविधा दिल्या तर गडबड होईल. मागच्या काळात अनेक राज्यांत उद्योग गेले आहेत. मुख्यमंत्री येतात. अपिल करतात. पण त्यामुळे आपण घाबरून जाण्याचं काही कारण नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मी जेव्हा मुख्यमंत्री होतो. तेव्हा देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात यायचे. उद्योजकांशी चर्चा करायला यायचे. मग तो काँग्रेसचा असो की भाजपचा. त्या सर्वांचं आम्ही स्वागत केलं. कारण आपला राज्यावर कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे फरक पडत नाही. पण इथे ममतादीदी आल्यातर स्वागत होतं अन् भाजप शासित राज्याचा मुख्यमंत्री आल्यावर टीका होते. ही दुटप्पी भूमिका आहे, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह; आशिष शेलारांची टीका

शिवसेनेने आणि राजशिष्टाचार मंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पायघड्या टाकल्या. त्यांचा दूत म्हणून काम केले. त्यांनी त्यांच्यासाठी बैठका अ‍ॅरेंज केल्याचाही संशय आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे, अशी घणाघाती टीका गुरुवारी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. शिवाय राज्य सरकार परमबीर सिंगांना वाचवत आहे, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही देशासमोर खोटे का बोलला, याचे उत्तर द्या. हे कायद्याचे राज्य आहे. कायद्याने चाला. तिन्ही पक्ष एकमेकाशी बोलत नाहीत. हेच यावरून दिसत आहे. राज्यातले मंत्री खोटं का बोलत होते, याचे उत्तर द्या, अशी मागणी त्यांनी केली.

शेलार यांनी मागील सात वर्षात ज्या पद्धतीने मोदी काम करत आहेत ते लोकांना मान्य आहे, असा दावा केला. सत्तेतले लोक त्यांचे दूत म्हणून काम करत असल्याचे दिसून येत आहे. जे पराभूत मनोवृत्तीचे आहेत, ते काय ठरवणार, असा सवाल त्यांनी केला. याचा अर्थ स्पष्ट आहे की, ममता बॅनर्जी ऐकत नाहीत. काँग्रेस आहे हे, ते मानत नाही. आणि शरद पवारांचे ऐकत नाहीत. यांचेच एकमेकांचे पाय एकमेकात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शेलार पुढे म्हणाले की, शिवसेनेचा महाराष्ट्र द्रोह आता त्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे संजय राऊत पांघरूण घालायचे. हा राजशिष्टाचार ममतांसाठी आहे. तो इतरांसाठी का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सावरकरांचा अपमान का?

सावरकरांच्या वक्तव्याबद्दल प्रियांका चतुर्वेदी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. कुठलाही शिवसैनिक सावरकरांचा असा उल्लेख करणार नाही. शिवसैनिकांना हे सहन होणार नाही. जे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहेत. त्यांना हा सावरकरांचा अपमान कधीच मान्य होणार नाही. हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या लोकांना तुम्ही भेटता, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. बाळासाहेबांचे शिवसैनिक यांना देखील प्रियंका चतुर्वेदी जे बोलल्या ते पसंत नाही. हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button