पप्पूसिंग दिल्लीवाले दिवानखान्यातल्या सोफ्यावर बसून पिझ्झा खात सकाळपासून पाचव्यांदा ‘ शोले’ पाहत बसले आहेत. मम्मा मॅडम नेहमीप्रमाणेच त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. कोणातरी वात्रटाने मागे त्यांना, ‘मैडम, जिनकी फसल खराब हुई है उनको मुआवजा मिल रहा है. आपको भी मिलना चाहिए. आपकी भी तो फसल खराब हुई है ना ? आप भी अर्जी दे दो.’ अशी चिट्ठी पाठवली होती. तेव्हापासून बरोबर तीन दिवसांनी ( म्हणजे, चिट्ठीचा अर्थ समजल्याबरोबर ) त्यांनी पप्पूसिंगवर, त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. मम्मा मॅडम हळूच पप्पूसिंगच्या शेजारी येऊन बसतात. त्याच्या हातातला रिमोट घेऊन सीडी बंद करतात.
मम्मा मॅडम – ( प्रेमाने पप्पूसिंगच्या जावळातून हात फिरवत ) बेटा, अरे आता मोठा झालास ना तू. लग्न केलं नाही म्हणून वय का थांबतं वाढायचं ? थोडं लक्ष घालत जा रे पक्षाच्या कामात.
पप्पूसिंग – मम्मा, आप क्यों फिकर करती हो ? मैं हूं ना !
ममा मॅडम – ( काळजीयुक्त सुरात ) अरे बेटा , असं बोलून कसं चालेल ? एकदा करोना आला आपल्या मदतीला. त्याच कारण सांगून प्रचारातून बाहेर पडता आलं. आता दरवेळी असं करून कसं चालेल ?
पप्पूसिंग – (आत्मविश्वासाने) मम्मा, पुढच्या सगळ्या निवडणुका आपण स्वबळावर लढवणार आहोत. तसं मी आपल्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांना निरोपच दिला आहे आणि ते लागलेसुद्धा कामाला.
मम्मा मॅडम – (गमतीने) बेटा, निवडणुका स्वबळावर लढणं काय पिझ्झा एकट्याने खाण्याइतकं सोपं वाटलं का तुला ?
पप्पूसिंग – ( पिझ्झाचा एक बाईट खात) डोन्ट वरी मम्मा. ‘उनकी’ सत्ता को सुरंग लगाने की तैयारियां हो चुकी है. सुरंग हमारे पास आ चुकी है. अब इलेक्शन का मुहूर्त देखकर सुरंग लगा देंगे.
मम्मा मैडम – ( चिंतेच्या स्वरात) देखो बेटा, आपको देश का नेतृत्व करना है. असं एखाद्या प्रदेशाध्यक्षासारखं बरळून कसं चालेल तुला ?
पप्पूसिंग – मम्मा, व्हॉट डू यु मिन बाय बरलिंग लाईक प्रदेशाध्यक्ष ? तुला त्या नाना पठोलेंबद्दल बोलायचं आहे का ?
मम्मा मॅडम – एक्झ्याटली . किती आवाज करतात रे ते , सायलेन्सर फुटलेल्या बुलेट सारखे ?
पप्पूसिंग – (गोंधळून) सायलेन्सर फुटलेल्या बुलेट सारखे म्हणजे ?
मम्मा मॅडम – अरे, त्या सायलेन्सर फुटलेल्या बुलेटमध्ये पेट्रोल असो की नसो, तिला किक मारली की दहा मैल ऐकायला जाईल इतका आवाज करते ती, पण सुरू काही होत नाही.
पप्पूसिंग – कमॉन मम्मा , तसं नाहीये ते. त्यांनी मला सांगितलं होतं, की ते वाघालाही घाबरत नाहीत आणि वाघाला नाचवणाऱ्या रिंगमास्टरला ही घाबरत नाहीत, म्हणून मी त्यांना स्वबळावर लढण्याबद्दल बोलण्याची परवानगी दिली होती.
मम्मा मॅडम – (गोंधळून ) व्हॉट डू यु मिन बाय वाघालाही घाबरत नाही आणि वाघाला नाचवणाऱ्या रिंगमास्टर लाही घाबरत नाही ?
पप्पूसिंग – ते तर आधी मलाही कळलं नव्हतं, पण नंतर त्यांनीच समजवून सांगितलं, की ते आपल्या तिथल्या कॉम्पिटिटर्सबद्दल बोलताहेत म्हणून.
मम्मा मॅडम – ( चौकसपणे ) कसा आहे रे तो माणूस ?
पप्पूसिंग – मस्त आहे मम्मा. उंच धिप्पाड आहे. त्याची छाती नक्कीच 56 इंचपेक्षाही जास्त असेल.
मम्मा मॅडम – ( कपाळावर हात मारत) बेटा, आपल्याला का कुस्ती खेळायची आहे का ? आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत रे. त्या कशा जिंकशील ?
पप्पूसिंग – ( डोळे मिचकावत) इसीलिए तो बारबार ‘शोले’ देख रहा हु मम्मा. आप भी देखो.
मम्मा मॅडम – ( काळजीच्या सुरात) ‘शोले’ देखकर क्या फायदा बेटा ?
पप्पूसिंग – मम्मा , ठाकुर जब गब्बरसे खुद नही लड़ सकता तो वो वीरू और जय को बुलाकर उसे मात देता है.
मम्मा मॅडम – ( चौकसपणे ) बेटा , तेरे पास कौनसे वीरू और जय है, जो तुझे इलेक्शन जितवा देंगे ?
पप्पूसिंग – दो की भी जरूरत नहीं मम्मा. मेरा तो एक ही काफी है.
मम्मा मॅडम – कौन ?
पप्पूसिंग – प्रशांत किशोर !