अर्थ-उद्योगलाईफस्टाईल

ओरिफ्लेमद्वारे जिओर्दानी गोल्ड एसेन्झा ब्लॉसम परफ्युमचे अनावरण

मुंबई : ओरिफ्लेमचा आयकॉनिक ब्रॅण्ड जिओर्दानी गोल्ड म्हणजे आलीशान राहणीमानाचे मूर्तीमंत प्रतीक आणि या ब्रॅण्डचा एसेन्झा पर्फ्युम हा तर जिओर्दानी गोल्डचा आत्माच आहे. आपल्या उंची, देखण्या कुपीमुळे, अभिजात सुगंधामुळे आणि गाभ्याशी असलेल्या खास ऑरेंज फ्लॉवर लक्झरी एसेन्झाच्या हार्टनोटमुळे सगळ्यांचा लाडका बनलेला हा जिओर्दानी एसेन्झा हा ओरिफ्लेमचा स्त्रियांसाठीचा सर्वाधिक विकला जाणारा परफ्युम आहे. याच गर्भश्रीमंत सुगंधाच्या पायावर ओरिफ्लेमने जिओर्दानी गोल्ड एसेन्झा ब्लॉसम पर्फ्युम हा सुंगधांचा नवा खजिना खुला केला आहे.

आयकॉनिक जिओर्दानी गोल्ड ब्रॅण्डची ४५वी वर्षपूर्ती साजरी करताना एसेन्झा ब्लॉसमने जणू काही एक रत्नच घडविले आहे. फॅब्रिस पेलेग्रिन आणि डॅफ्ने बुगे या दोन विख्यात परफ्युमर्सनी अत्यंत सर्व तपशीलांकडे बारकाईने लक्ष पुरवत तयार केलेला जिओर्दानी गोल्ड एसेन्झा ब्लॉसम परफ्युमचा सुगंध गडद असावा आणि तो दीर्घकाळ रेंगाळावा यासाठी त्याला अतिशय दाट बनविण्यात आले आहे. मौल्यवान रोझ गोल्ड अकॉर्ड तयार करण्यासाठी यात कॅमेलिया आणि जॅस्मिन यांच्या सुगंधांचा मुक्त मिलाफ घडवून आणण्यात आला आहे आणि झाकणावर अस्सल १८ कॅरेट रोझ गोल्डची नक्षी असलेल्या आयकॉनिक कुपीमध्ये हा सुगंध बंद करण्यात आला आहे.

हा मौल्यवान सुगंध सुरुवातीला शुभ्र फुलांच्या प्रकाशमान गुच्छाच्या सुवासासोबत पेअर आणि मँडरीनच्या सुगंधाची पखरण करतो. संवेदना जागविणारे ऑरेंज ब्लॉसम आणि जॅस्मिनच्या दाट सुगंधाची कॅमेलियाच्या नाजूक मंद सुगंधाबरोबर मिसळण होत असतानाच व्हॅनिला आणि मस्कच्या हव्याहव्याशा सुवासाच्या नोट्स मिसळतात आणि हा सुगंध अधिकच उबदार बनतो. ‘फ्लॉवर ऑफ लक्झरी’ म्हणवले जाणारे कॅमेलिया या सुगंधाला एक हळुवारपणा मिळवून देते. तुस्कानीच्या कोसेर्टा रॉयल पॅलेसमध्ये पहिल्यांदा घडविण्यात आलेला हा विविध गंधांनी सुशोभित सेलिब्रेटिसिमा’ म्हणजे उत्सवी माहौल आणि आलीशानतेचे मूर्त रूप आहे.

ओरिफ्लेमचे प्रवक्ता म्हणाले, जिओर्दानी गोल्डच्या क्लासिक एसेन्झा परफ्युमच्या नव्याको-या, रोझ गोल्ड आवृत्तीसह अभिजात, उंची जीवनशैलीचा आनंद अनुभवता येईल. हा उच्च दर्जाचा सुगंध दीर्घकाळ दरवळत राहतो आणि तुमच्या अवतीभोवती असलेल्यांना संमोहित करतो. ऑरेंज ब्लॉसम, कॅमेलिया आणि जॅस्मिन यांचे मिश्रण असलेल्या या सुगंधामुळे तुमचे भान हरपेल आणि या गंधाचा तुमच्या त्वचेला स्पर्श होताक्षणी तुमची आभा अधिकच झळाळून निघेल. आमच्या ग्राहकांना हा उबदार आणि संवेदना जाग्या करणारा अनोखा परफ्युम नक्की आवडेल, याची आम्हाला खात्री आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button