हिरो मोटोकॉर्पच्या ‘एक्सपल्स २०० ४ वॉल्व्ह’च्या पुढील बॅचसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू
नवी दिल्ली : सुधारित व कॉन्टॅक्टलेस ग्राहक अनुभवासाठी आपले डिजिटल उपक्रम अधिक प्रबळ करत हिरो मोटोकॉर्प या जगातील सर्वात मोठ्या मोटरसायकल्स व स्कूटर्स उत्पादक कंपनीने आज त्यांची आधुनिक मोटरसायकल एक्सपल्स २०० ४ वॉल्व्हच्या ऑनलाइन बुकिंग्जच्या शुभारंभाची घोषणा केली. कंपनीने पहिल्या बॅचची संपूर्ण विक्री झाल्यानंतर दुस-या बॅचसाठी बुकिंग्ज स्वीकारायला सुरूवात केली आहे.
१३०,१५० रूपये (एक्स-शोरूम – दिल्ली) किंमत असलेली ही मोटरसायकल १०,००० रूपयांचे आगाऊ पेमेण्ट करत एकसंधी खरेदी अनुभवासाठी कंपनीचे ऑनलाइन विक्री व्यासपीठ ईशॉप (eSHOP) वर बुक करता येऊ शकते. युजर-अनुकूल यंत्रणा ग्राहकांना निर्णय घेणे, वेईकल खरेदी करणे आणि डिलिव्हरी घेणे अशा सर्व संबंधित पाय-यांमध्ये मार्गदर्शन करते.
बुकिंग्जच्या शुभारंभाबाबत बोलताना हिरो मोटोकॉर्पच्या सेल्स व आफ्टरसेल्सचे प्रमुख नवीन चौहान म्हणाले, ”हिरो एक्सपल्स २०० नेहमीच अपवादात्मक तंत्रज्ञान, आधुनिक डिझाइन आणि वैशिष्ट्यपूर्ण आकर्षकतेचे पाठबळ असलेला अद्वितीय अनुभव देण्यासाठी ओळखली जाते. आम्हाला ग्राहकांकडून एक्सपल्स २०० ४ वॉल्व्हसाठी मिळालेला सकारात्मक प्रतिसाद व व्यापक स्वीकृतीचा आनंद होत आहे. त्वरित विक्री झालेल्या पहिल्या बॅचमधून प्रिमिअम-मोटरसायकल मागणीप्रती वाढ, तसेच ग्राहकांचा हिरो ब्रॅण्डमधील आत्मविश्वास दिसून येतो. ऑनलाइन बुकिंग्जच्या आणखी एका बॅचच्या शुभारंभासह आम्ही देशामध्ये एक्सपल्स २०० ४ वॉल्व्हसाठी अधिक मागणी वाढण्याची अपेक्षा करतो.”
ऑन-रोड व ऑफ-रोड सज्जता, अत्याधुनिक तंत्रज्ञान व वैशिष्ट्यपूर्ण स्टाइलिंगसह एक्सपल्स या भारताच्या पहिल्या २०० सीसी साहसी मोटरसायकलने एप्रिल २०१९ मध्ये लाँच झाल्यापासून जगभरातील तरूणांचे लक्ष वेधून घेतले आहे. एक्सपल्स २०० ला भारतीय दुचाकी उद्योगक्षेत्रामधील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार इंडियन मोटरसायकल ऑफ दि इअर (आयएमओटीवाय) २०२० सह गौरविण्यात आले.
नवीन एक्सपल्स २०० ४ वॉल्व्ह उच्च तंत्रज्ञान साहसी अनुभवानुसार निर्माण करण्यात आली आहे. ही मोटरसायकल २०० सीसी बीएस-६ ४ वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिनसोबत येते. हे इंजिन ६ टक्के जास्त शक्ती आणि ५ टक्के अतिरिक्त टॉर्क देते आणि त्याद्वारे अत्यंत जास्त वेगावरही शांत आणि तणावमुक्त राइडचा आनंद घेता येतो.
उत्पादनाची वैशिष्ट्ये – एक्सपल्स २०० ४ वॉल्व्ह
एक्सपल्स २०० बीएस-६ २०० सीसी ४ वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिनाने युक्त आहे. या इंजिनमधून ८५०० आरपीएमवर १९.१ पीएसची शक्ती आणि ६५०० आरपीएमवर १७.३५ एनएम टॉर्क निर्माण होतो. ४ वॉल्व्ह ऑइल कूल्ड इंजिन मध्यम व उच्च वेगाच्या श्रेणीत उत्तम शक्ती देण्यासोबत अत्यंत उच्च वेगावरही तणावमुक्त इंजिन कामगिरी देते आणि व्हायब्रेशन्स नियंत्रणात ठेवते.
प्रचंड ट्रॅफिकमध्ये उष्णतेच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी कूलिंग यंत्रणा आता ७ फिन ऑइल कूलरने अद्ययावत केलेली आहे. एक्सपल्स २०० ४ व्हीमधील मोठ्या प्रमाणावर सुधारलेले ट्रान्समिशन चांगली शक्ती व टिकाऊपणा देते. गिअरचे प्रमाण अधिक ट्रॅक्टिव्ह कार्य आणि अॅक्सलरेशनसाठी अद्ययावत केलेले आहे.
हाय-टेक साहस
अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त एक्सपल्स २०० ४ व्ही लांबच्या प्रवासादरम्यान आरामदायी राइडची हमी देते. अद्ययावत एलईडी हेडलाइटमुळे रात्रीच्या वेळी अधिक सुस्पष्ट दृश्यमानता मिळते, ज्यामुळे रस्त्यावर एकसमान प्रकाश दिसण्याची खात्री मिळते.
या मोटरसायकलमध्ये सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत- जसे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर व कॉल अलर्ट्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, गिअर इंडिकेटर, इको मोड आणि दोन ट्रिप मीटर व प्रमाणित ऑफरिंग म्हणून सिंगल चॅनल एबीएस.
सर्व प्रकारच्या प्रदेशांवर साम्राज्य करण्याच्या ध्येयाने प्रेरित या मोटरसायकलमध्ये दीर्घ सस्पेंशन ट्रॅव्हल आहे- १९० मिमी फ्रंट व १७० मिमी रिअर आणि त्याचबरोबर २१ इंच फ्रंट व १८ इंच रिअर स्पोक व्हील्स आहेत. खडकाळ व अवघड प्रदेशात अडथळ्यांपासून मुक्त राइडची हमी देण्यासाठी मोटरसायकलमध्ये अॅल्युमिनियम स्किड प्लेट्स आहेत, ज्या इंजिनचे रक्षण करतात. जास्तीत-जास्त ग्रिप आणि नियंत्रणासाठी नवीन टोकदार ब्रेक पॅनल आहे आणि खोल पाण्यातून जाण्यासाठी वरच्या बाजूला एक्झॉस्ट लावलेला आहे.
ऑन /ऑफ रोड सज्जता
दुहेरी उद्दिष्ट टायर्स, १० स्टेप अॅडजस्टेबल मोनो शॉक सस्पेंशन, ८२५ मिमी सीटची उंची आणि २२० मिमीचा जास्त ग्राऊंड क्लिअरन्स ही वैशिष्ट्ये साहसी प्रवाशासाठी उत्तम पॅकेज देतात.
उत्तमरित्या तयार केलेल्या चॅसिसमुळे एक्सपल्स २०० ४ व्ही दैनंदिन प्रवास असो किंवा गावातील रस्त्यांवरून आनंदासाठी प्रवास करायचा असो किंवा ऑफ-रोड प्रदेशात ड्रायव्हिंग करायचे असो उत्तम रायडिंग अनुभव मिळण्याची खात्री देते.
दिवसरात्र प्रवास करा
अद्ययावत प्रवास क्षमतेसाठी मोटरसायकलमध्ये लगेज प्लेट आणि बंजी हुक्स देण्यात आले आहेत. त्यामुळे पिलियन रायडरसोबत सामानही वाहून नेता येईल. सुधारित सीट आरामदायीपणामुळे प्रत्येक किलोमीटर अधिक आनंददायी आणि सहजपणे पार होतो. संरक्षक विंडशील्डमुळे उत्तम वारा आणि हवामान संरक्षण तसेच एकूणच चांगला रायडिंगचा आनंद मिळतो. यूएसबी चार्जरमुळे रायडरला संपूर्ण प्रवासात कनेक्टेड राहता येते आणि पुढील व मागील पेडल डिस्क ब्रेक्स ब्रेकिंग सहजसोपे करतात.
आकर्षक रंगांचे पर्याय
साहस आणि ऑफ-रोडच्या उत्साहाने सज्ज असलेली नवीन एक्सपल्स २०० ४ व्ही मोटरसायकल तीन नवीन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये येते – ट्रेल ब्लू, ब्लिट्झ ब्ल्यू आणि रेड रेड. त्यामुळे ही मोटरसायकल लोकांचे लक्ष सहजपणे वेधून घेते.