राजकारण

उद्धव ठाकरेंविषयी आक्षेपार्ह लिखाण; नवी मुंबईत भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक

नवी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. रश्मी ठाकरे यांच्याविषयी ट्वीट केल्याबद्दल भाजप पदाधिकारी जितेन गजारिया यांच्यावरील कारवाईचा प्रकार ताजा असतानाच आणखी एक अटक झाली आहे. ठाकरेंविषयी लेखनाबद्दल संदीप म्हात्रे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी संदीप म्हात्रेंना अटक केली. म्हात्रेंनी फेसबुकवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसैनिकांनी पोलिात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी म्हात्रेंवर कारवाई केली. संदीप म्हात्रे हे नवी मुंबईतील कोपरखैरणे भागातील समाजसेवक असून भाजप आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक मानले जातात. संदीप म्हात्रे यांच्या पत्नी माजी नगरसेविका आहेत.

जितेन गजारिया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे उपशहर संघटक उमेश वाघ यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार जितेन गजारिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्विटरच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर ट्विट करून त्याने ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वाघ यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button