पुणे : पुण्यात विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राम्हण महासंघाच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गोखलेंनी भाजप – शिवसेना युतीवर भाष्य केले होते. शिवसेना – भाजप एकत्र येण्यासाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले होते. या वक्तव्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया आहे.
‘शिवसेना – भाजप एकत्र येण्याची आमची इच्छाच नाहीये. आणि आम्हाला शिवसेनेबरोबर निवडणुकाही लढवायच्या नाहीत असे ते म्हणाले आहेत. बाळासाहेबांबद्दलच माझं प्रेम हे राजकीय प्रेम नाही. शिवसेना आणि भाजप एकत्र येण्यासाठी तर हे प्रेम बिलकुलच नाही. प्रेम हे त्यांच्या कर्तृत्वामुळे श्रद्धेपोटी आहे. मी मुंबईत राहतो त्याठिकाणी चारही बाजूने मुस्लिम एरिया आहे. दंगे होयचे तेव्हा शिवसेना आम्हाला सुरक्षित ठिकाणी नारळवाडीत घेऊन जायची. ती शिवसेना आणि या शिवसेनेत फरक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
कंगना रानौतबाबत पाटील म्हणाले, कंगना रानौतने हे म्हणायला हरकत नाही. की मोदीजी आल्यापासून आम्हाला स्वातंत्र्याचा अनुभव आला. तिने १९४७ च्या स्वातंत्र्यावर टीका टिपण्णी करण्याचं काहीच कारण नाही. गोखले म्हणालेत तर देवेंद्र आणि आपण मिळून टॅली करून घ्यायला हरकत नाही. त्यात आम्हाला आमची कोणतीही चूक वाटत नाही. आमच्या १०५ जागा यांच्या ५६ मग मुख्यमंत्री कोण होयला पाहिजे हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही ताकदीने निवडणूक लढतो म्हणून एवढ्या जागा निवडून आणतो असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
काय म्हणाले होते गोखले
शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांना रोखठोक प्रश्न मी तेव्हा विचारले होते, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले. ते पुण्यात ब्राम्हण महासंघाद्वारे त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विक्रम गोखले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राजकीय मुद्द्यांवर रोखठोक विधानं केली. ज्या मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा आणि शिवसेना दुरावले त्या प्रसंगाबाबत विक्रम गोखले यांनी एक गौप्यस्फोटच यावेळी केला.
शिवसेना-भाजपा एकत्र यावेत यासाठी मी प्रयत्न करत आहे. युती झाली त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना थेट विचारणा केली होती. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी दिलं असतं तर काय बिघडलं असतं? असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची? असंही मी त्यांना म्हटलं होतं, असं विक्रम गोखले म्हणाले. त्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया काय होती? असं विक्रम गोखले यांना विचारण्यात आलं असता फडणवीसांनी झाली चूक असं म्हटलं होतं, असा दावा गोखले यांनी केला.
फडणवीसांनी तेव्हा झाली चूक असं मला म्हटलं होतं. पण खरंतर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना तुम्ही फसवू शकत नाही. कारण मग लोक कधीतरी त्याची प्रचंड शिक्षा तुम्हाला करतात. ती आता आपण भोगत आहोत. मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि म्हणूनच मी कोणत्याही राजकीय पक्षाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश वगैरे झुगारुन देतो, असं गोखले म्हणाले.
शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरू आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे, असंही विक्रम गोखले म्हणाले आहेत. चुकलेलं गणित नीट करायचं असेल. तर अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावर आपला देश उभा आहे. त्यातून जर मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र यायलाच पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असंही ते म्हणाले.