राजकारण

आता सचिन वाझेचा ‘लेटर बॉम्ब’; अनिल देशमुखांनी नियुक्तीसाठी मागितले २ कोटी, अनिल परब यांनीही मागितली खंडणी !

गुटखा घोटाळ्याच्या चौकशीला अजित पवारांचा विरोध

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझेनं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील ३ मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझेने या पत्रात केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे याने लिहिलं आहे. ते पत्र आता एनआयए कोर्टात सादर केले जाणार आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप सचिन वाझे यांनी पत्रात केला आहे. या पत्रात महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. वाझे यांनी एनआयएच्या कस्टडीत बसून त्यांच्या वकिलांसमोर हे पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. वाझे यांचं निलंबन झालं तेव्हा स्वत: देशमुख यांनी त्यांना फोन केला होता. यावेळी परत सेवेत घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप वाझेंनी केला आहे. एकूण तीन पानांचं हे पत्र आहे.

मी सेवेत आल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार आणि पब आस्थापनांकडूनही वसुली करण्याचे टार्गेट दिलं होतं, असा खुलासा सचिन वाझेंनी लेटरबॉम्बमध्ये केला आहे. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या आरोपासारखेच सचिन वाझेंचेही आरोप दिसत आहेत. सचिन वाझे यांच्या पत्रावरून आता कोर्टाने सीबीआयला आदेश दिले आहेत. या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. आता या प्रकरणी एनआयए बरोबरच सीबीआयकडूनही प्रत्यक्षरित्या तपासाला सुरूवात होणार आहे. इतकंच नाही तर सबंधित पत्रावरून मॅजिस्ट्रेट समोर वाझेंचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. लिहिलेल्या पत्रावरून वाझेंनी घुमजाव करू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये तत्कालीन गृहमंत्र्यांनी मला सह्याद्री गेस्ट हाऊसवर बोलावलं होतं आणि मुंबई शहरातील 1 हजार 650 बार, रेस्टॉरंट्समधून पैसा गोळा करण्यास सांगितलं होतं. मात्र, हे आपल्या क्षमतेच्या बाहेर असल्याचं सांगत आपण त्यास नकार दिला होता. इतकंच नाही तर सचिन वाझे यांनी आपल्या पत्रात अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केलाय.

अजित पवारांचेही नाव

सचिन वाझेंनी त्यांच्या पत्रात अजित पवार यांचं देखील नाव घेतलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुटखा घोटाळ्याच्या चौकशीला विरोध केल्याचं वाझेंनी पत्रात म्हटलं आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख्यांविरोधात केलेल्या आरोपांसंबंधीत याचिकेवर सुनावणी देत मुंबई हायकोर्टाने देशमुखांविरोधातील आरोप योग्य आहे किंवा नाहीत याबाबत प्राथमिक चौकशी करण्यासाठी सीबीआयला १५ दिवसांची मुदत दिली आहे. हायकोर्टाच्या सीबीआय चौकशीच्या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. दरम्यान देशमुख यांना सुप्रीम कोर्टात जाण्याचे मार्गही बंद झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून देशमुख यांच्या बचावासाठी प्रयत्न केले जात आहेत. याप्रकरणावर हायकोर्टाने सांगितले की, हे प्रकरण असाधारण आणि अभूतपूर्व असल्याने याची स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. तर उच्च न्यायालयाने यावर ५२ पानांचा आदेश सांगितले की, अनिल देशमुखांवर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे नागरिकांमध्ये राज्यातील पोलीसांच्या प्रतिमेला ठेच पोहचल आहे. परमबीर सिंह यांनी २५ मार्चला अनिल देशमुखांविरोधात याचिका दाखल करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या याचिकेत सिंह यांनी अनिल देशमुखांवर भष्ट्राचारासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझेसह अन्य पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार, रेस्टॉरंसमधून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते. असे नमुद करण्यात आले आहे. यातील सचिन वाझेंना अंबानी यांच्या एंटिलिया बंगल्याबाहेर स्फोटकाप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून एनआयएने अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button