‘नोमॅडलॅंड’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार
लॉस अँजेलिस : रविवारी संध्याकाळी अमेरिकेत झालेल्या ९३ व्या ऑस्कर सोहळ्यात मोहोर उमटवली ती नोमॅडलॅंडने, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा मानही याच चित्रपटाचे दिग्दर्शक शॅलो झॅओ यांना मिळाला. ऑस्करच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरिअन अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं ऑस्कर मिळालं. मिनारी चित्रपटासाठी यू जंग यौन यांना गौरवण्यात आलं. इतकंच नव्हे, तर या निमित्ताने ऑस्करने पहिल्यांदाच एशियन दिग्दर्शिकेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ऑस्कर मिळालं. यापूर्वी केवळ पाच महिला दिग्दर्शकांना ऑस्करसाठी नामांकन प्राप्त झालं होतं. तर यापेकी कॅथरिने बिंगलोव यांना २०१० साठीच्या ‘द हर्ट लॉकर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचं ऑस्कर मिळालं होतं.
कलाविश्वात अतिशय मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा रविवारी पार पडला. यात एकामागून एक कलाकाविष्कारांचा गौरव या सोहळ्यात झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे पार पडलेल्या या ९३ व्या ऑस्कर सोहळ्यात विविध विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सोहळा यासाठी खास आहे, कारण त्याचं सूत्रसंचालन कोणाच्याही हाती नव्हतं, ना कोणी प्रेक्षकही या सोहळ्यासाठी उपस्थित नव्हते.
ऑस्कर सोहळ्यामध्ये दरवर्षी जे कलाकार हे जग सोडून निघून गेले त्यांना आदरांजली वाहिली जाते. हे वर्षंही त्याला अपवाद नव्हतं. यावेळी इरफान खान आणि जगविख्यात वेषभूषाकार भानू अथय्या यांना आदरांजली वाहण्यात आली.
It's official! #Oscars pic.twitter.com/EjlbzePvqR
— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ठरलेले काही चित्रपट असे, सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमॅडलॅंड. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – शॅलो झॅओ, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – फ्रान्सिस मॅकडरमंड ( नोमॅडलॅंड), सर्वोत्कृष्ट अभिनेता – एंथनी हॉपकिन्स (द फादर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – डॅनिअल कलुआ (ज्युडस एंड द ब्लॅक मसाया) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री -यो जंग यौन (मिनारी), सर्वोत्कृष्ट एनिमेटेड फिल्म – साऊल, सर्वोत्कृष्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म – अनादर राऊंड (डेन्मार्क).