आरोग्यराजकारण

नितीन सरदेसाई यांची कोरोना संकटातील अविरत सेवा

मुंबई : राज्यात मागील वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाने संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त केले असताना समाजातून अनेक संस्था, संघटना, व्यक्तींचे मदतीचे हात पुढे आले आहेत. अशीच अविरत सेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अर्थात मनसेचे नेते, माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी सुरू ठेवलेली आहे.

गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनपासून सुरू असलेली ही सेवा आजही अविरत सुरूच आहे. कोविडची पहिली लाट ओसरून परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येत आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा सर्व थांबलं आहे. हाताला काम नाही, पोटात अन्न नाही अशा लोकांना एकवेळचे अन्न मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मिळणारे समाधान केवळ अवर्णनीय आहे. या कठीण प्रसंगी शक्य तेवढी मदत गरजवंतांना करणे हे माणूस म्हणून आपले कर्तव्यच आहे. माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या सहकार्याने हे सेवा कार्य असेच सुरू राहणार आहे, असा विश्वास मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी कोरोना संकटकाळात दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button