ये है उद्धव ठाकरे का ‘नया महाराष्ट्र’; नितेश राणेंची टीका
मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि उद्यानेही खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अजूनही मंदिर उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. ये है उद्धव ठाकरे का ‘नया महाराष्ट्र’, असा खोचक टोला भाजप आ. नितेश राणे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!!
कारण..
हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे..
हिंदू हो..
तो डर के रहो..
ये है उद्धव का "नया" महाराष्ट्र !!— nitesh rane (@NiteshNRane) August 18, 2021
नितेश राणे यांनी ट्विट करून हा टोला लगावला आहे. महाराष्ट्रात मंदिर बंदच राहणार!! कारण… हिंदू धर्माला आव्हान देणारे सरकार महाराष्ट्रात आहे… हिंदू हो, तो डर के रहो… ये है उद्धव का “नया” महाराष्ट्र, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे. नितेश राणे यांनी अत्यंत खोचकपणे मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली आहे. त्यामुळे त्याला शिवसेनेतून काय उत्तर येतं हे पाहावं लागणार आहे.