जेलमध्ये जायचं नसेल, तर भाजपसमोर गुडघे टेका, पण माफी नाही !
निलेश राणेंचा शिवसेना नेत्यांना सल्ला
मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिल्या पत्रामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. प्रताप सरनाईक यांना आता जेल दिसायला लागलं. यांच्या सर्व मंत्र्यांना जेल जवळ दिसलं म्हणून युती पाहिजे. यानंतर आता अनिल परब आहेत. जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का? अशी माफी मिळत नाही. यांचे गुडघे पण जेलमध्येच टेकावे लागले तरी त्यांना माफी नाही, असा हल्लाबोल भाजप नेते निलेश राणे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत निलेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य चालवत आहेत. ही नवीन गोष्ट नाही. आम्ही सुरुवातीपासून तेच सांगतो आहे. राज्य अजित पवार चालवतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कुठे? ज्या ठिकाणी पवारांचे आमदार आहेत. त्याठिकाणी निधी दिला जातो. या सत्तेत नामधारी म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
काय परिस्थिती आलीय .
कOन सत्तेत कोण विरोधात ?