बातम्यांच्या निवडक १००० साइटवरून बातम्या निवडणारे ‘न्यूज दॅट मॅटर्स’ अॅप दाखल
News that Matters app launched
मुंबई : बातम्यांच्या निवडक 1000 साइटवरून विविध कीवर्डच्या आधारे बातम्या निवडणारे न्यूज दॅट मॅटर्स हे बातम्या संकलित करणारे अँड्रॉइडसाठीचे अॅ दाखल करण्यात आले आहे. एकाच ठिकाणी विविध कीवर्डचे अलर्ट देण्याचे ऑनलाइन वृत्तवाचकांपुढील महत्त्वाचे आव्हान या अॅपमुळे पेलले जाणार आहे. कीवर्ड अलर्ट केव्हाही बदलता येऊ शकतात, तसेच प्लॅटिनम सबस्क्रायबरसाठी असंख्य कीवर्ड व बातम्या उपलब्ध असतील. हे अॅप गुगल प्लेस्टोअरवरून मोफत डाउनलोड करता येऊ शकते आणि 22 एप्रिल 2021 पूर्वी डाउनलोड केल्यास वर्षभऱ प्लॅटिनम सबस्क्रिप्शन मोफत दिले जाणार आहे.
न्यूज दॅट मॅटर्सचे प्रॉडक्ट लीड दीपक राय यांनी नमूद केले, तरुण पिढीला विविध ठिकाणांहून माहिती एकत्र करणाऱ्या, तसेच माहितीच्या सत्यतेची खात्री न देणाऱ्या सर्वसामान्य सर्च इंजिनकडून बातम्या मिळवण्याऐवजी निवडक व विश्वासार्ह ठिकाणाहून बातम्या उपलब्ध करणे, हे या अॅपचे उद्दिष्ट आहे. सर्च लिस्टमध्ये समाविष्ट करण्याच्या आधी न्यूज दॅट मॅटर्स ऑनलाइन न्यूज साइटची सत्यता पडताळून पाहणार आहे. युजरना ऑनलाइन न्यूज वेबसाइट उपलब्ध करण्याबरोबरच, हे अॅप कण्टेण्ट निर्माण करणाऱ्यांना अधिकाधिक युजर मिळण्यासाठीही मदत करणार आहे.
कोणत्या प्रकारच्या बातम्या पाहायच्या, या बाबतीत लोकांच्या आवडीनिवडी सातत्याने बदलत असतात. तसेच, नव्या घडामोडी किती वेगाने मिळणार, हेही महत्त्वाचे ठरते. ‘न्यूज दॅट मॅटर्स’ लोकांच्या या गरजा विचारात घेणार आहे आणि त्यांना त्यांच्या पसंतीच्या बातम्या निवडण्याची सुविधा देणार आहे. सबसक्रायबरना दिवसातून जास्तीत जास्त 30 वेळा त्यांच्या इच्छेनुसार कीवर्ड आणि बातम्या मिळण्याची वारंवारिता बदलता येऊ शकते. विशिष्ट बातम्यांबरोबरच, यामध्ये अठरा क्षेत्रानिहाय बातम्यांचाही समावेश केला आहे. त्यामुळे हे अॅप पत्रकार, संशोधन संस्था, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, पब्लिक रिलेशन्स आणि या क्षेत्रांचा मागोवा घेणाऱ्या अन्य व्यक्ती यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
बातम्यांच्या बाबतीत प्रत्येकाच्या स्वतःच्या आवडीनिवडी असतात. विशिष्ट वेळी ठराविक प्रकारच्या बातम्याच केवळ सर्वांचे लक्ष वेधून घेतात, असे कंपनीच्या संशोधनात आढळले आहे. वैयक्तिक आवडीनिवडी, जगातील घडामोडी, व्यक्ती किंवा कंपन्या, घटना याविषयी रुची यामध्ये होणाऱ्या बदलांवर बातम्यांची लोकप्रियता अवलंबून असते. नव्या तंत्रज्ञानामुळे बातम्या जाणून घेण्याच्या पद्धतीमध्ये बदल होत आहेत. लोकांच्या गरजा व पसंती जाणून घेतल्या जात आहेत आणि त्यानुसार त्यांना मोजक्याच बातम्या दिल्या जातात. अनावश्यक बातम्या देणे टाळले जाते, असे राय यांनी सांगितले.
हे मोफत अॅप गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकते.
https://play.google.com/store/apps/details?id=news.newsthatmatters.newsthatmatters