रावळपिंडी : न्यूझीलंड क्रिकेटने पाकिस्तानचा दौरा रद्द करत असल्याची घोषणा केली. रावळपिंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सामन्याला काही मिनिटे शिल्लक असतानाच सुरक्षेच्या मुद्द्यावर हा सामना रद्द करण्यात आल्याचे कळते. दोन्ही देशातील क्रिकेट बोर्डाने याबाबतचा संयुक्तिकपणे असा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. जवळपास १८ वर्षांनंतर पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी न्यूझीलंडचा संघ पोहचला होता. या दोन्ही संघादरम्यान १८ वर्षानंतर रावळपिंडी येथे सामना आयोजित करण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे सामना सुरू होण्याआधी अवघ्या काही मिनिटांपूर्वीच हा सामना रद्द करण्यात आला आहे.
न्यूझीलंड सरकारला सुरक्षिततेच्या बाबतीत मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानाच सुरक्षिततेच्या दृष्टीने धोका असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासोबतच न्यूझीलंडच्या सुरक्षा सल्लागाराने दिलेल्या माहितीनुसार न्यूझीलंडचा संघ हा सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच या दौऱ्यातील सामना खेळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही हा दौरा रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. पण पाकिस्तानातील क्रिकेटप्रेमी मात्र या निर्णयामुळे निराश झाले आहेत. शेवटच्या मिनिटाला सामना रद्द झाल्याने क्रिकेटप्रेमींचा हिरमोड झाला आहे.
पाकिस्तानच्या माहिती प्रसारण मंत्रालयाकडून न्यूझीलंडचे जेसिंदा एर्डेर्न यांना शुक्रवारी सुरक्षेची हमी देण्यासाठी इम्रान खान यांच्या मंत्रीमंडळाकडून आश्वासन देण्यात आले. पण तरीही न्यूझीलंड क्रिकेटना हा दौरा रद्द करत असल्याचे सांगितले. पाकिस्तानेच पंतप्रधान इम्रान खान हेदेखील न्यूझीलंडचे पंतप्रधान यांच्या संपर्कात होते. तसेच पाकिस्तानात संपुर्ण सुरक्षा देणार असल्याचे पीसीबीच्या वतीने सांगण्यात आले. न्यूझीलंड संघाचे खेळाडूही सध्या पुरविण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेशी समाधानी असल्याचे पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री फवाड चौधरी यांनी स्पष्ट केले होते.
आमच्या गु्प्तचर यंत्रणा या या जगातील सर्वोत्तम यंत्रणांपैकी एक आहेत. त्यामुळेच न्यूझीलंडच्या संघाला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले होते. पण न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी दिलेल्या माहितीनुसार हा दौरा पुर्ण करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सुरक्षेसाठीच्या सल्ल्यामुळेच हा दौरा संपुष्टात आला असल्याचेही क्रिकेट न्यूझीलंडने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानसाठी हा धोका असणार आहे. पाकिस्तान हा क्रिकेट मालिकेसाठी चांगला यजमान असा देश आहे. पण खेळाडूंची सुरक्षाही महत्वाची आहे. त्यामुळे हाच जबाबदार पर्याय मानत आम्ही दौरा रद्द करत असल्याचे क्रिकेट न्यूझीलंडने दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. न्यूझीलंडच्या संघाला पाकिस्तानातून न्यूझीलंडला परतण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीलंकेचा संघ २००८ मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असताना झालेल्या हल्ल्यामुळेच पाकिस्तान संघाला मोठा फटका बसला आहे. लाहोरमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद गेली अनेक वर्षे कायम आहेत. त्यामुळे पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी संघाना निमंत्रित करण्यात बोर्डाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तानने गेल्या काही वर्षात अनेक संघ दौऱ्यासाठी बोलावण्याचा प्रयत्न केला आहे. पण २००८ च्या हल्ल्याचे पडसाद आजही कायम आहेत.
याआधी २०१५ मध्ये झिंबाब्वेचा संघ हा पाकिस्तानात मालिका खेळण्यासाठी आला होता. त्यानतंर अनेक देश याठिकाणी मालिका खेळण्यासाठी आले. पण दक्षिण आफ्रिकेचा संघ हा गेल्या जानेवारीत मालिका खेळलेला संघ ठरलेला आहे. आता इंग्लंडचा संघ आगामी महिन्यात पाकिस्तान दौऱ्यासाठी येणार आहे. या दौऱ्याला इंग्लंडचा संघ येणार का ? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.