आरोग्यस्पोर्ट्स

न्युबर्ग डायग्नोस्टिक्सने आयपीएल टीमसाठी कोविड स्क्रिनिंगच आयोजित केले

मुंबई : भारतातील चौथा क्रमांका ची पॅथॉलॉजी प्लेयर, न्युबर्ग डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड आयपीएलच्या सर्व सदस्यांसाठी कोविड19 आरटी पीसीआर चाचणी घेत आहे. सुरुवातीच्या सामने खेळल्या जाणार्‍या मुंबई आणि चेन्नई येथे यापूर्वीच संघांची स्क्रीनिंग सुरू झाली आहे. यापूर्वी चेन्नईतही आयपीएलच्या लिलावादरम्यान न्युबर्ग डायग्नोस्टिक्सने स्क्रिनिंग घेतली होती.

मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व खेळाडू, व्यवस्थापन पथक, प्रसारण दल, राज्य व केंद्रीय क्रिकेट समिती सदस्य,मैदानरक्षक,हॉटेल कर्मचारी आणि कार्यक्रम व्यवस्थापन पथकाची चाचणी घेण्यात येत आहे. बायो बबलमध्ये स्टेडियमवर आणि इतर कर्मचार्‍यांसाठी नियमित अंतरावरील स्टेडियमवर विविध हॉटेल्समध्ये चाचण्या घेतल्या जात आहेत.

न्युबर्ग डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या ग्रुप चीफ ऑपरेटिंग मिस.ऐश्वर्या वासुदेवन या प्रगतीबद्दल बोलताना म्हणाले की,“आयपीएल 2021च्या सुरळीत कामकाजासाठी आम्ही संघातील सर्व सदस्यांची मैदानावर चाचणी घेतली आणि त्यांचा विषाणूचा प्रसार रोखण्यात मदत केल्याबद्धल आनंदी आहोत.”

मुंबई,चेन्नई, दिल्ली, अहमदाबाद, आणि कोलकाता या सर्व आयपीएल ठिकाणी न्युबर्ग चाचणी घेणार आहेत. न्युबर्ग नमुना संकलनासाठी आयसीएमआर (ICMR)आणि राज्य सरकारच्या अधिका-यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रोटोकॉलचे अनुसरण करतात. “सोयीसह सुरक्षिता” या मंत्रासह,न्युबर्ग हे सुनिश्चित करतात की नमुना गोळा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांचे फ्लेबोटॉमिस्ट पीपीई,फेस शील्ड,ग्लोज,मुखवटे इ. परिधान करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button