राजकारण

राष्ट्रवादीच्या आमदाराचे थेट ईडी, इन्कम टॅक्सलाच आव्हान

सातारा : राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही नेत्यांवर ईडीकडून कारवाई सुरु आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. आमदार शशिकांत शिंदे यांनी ईडीला आव्हान देताना आपण ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बापाला घाबरत नसतो, असे म्हटले आहे.

भाजपच्या ईडीला पळवून लावणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. जरंडेश्वर कारखान्यावर आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबाबत आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले म्हणून आम्ही शांत बसलो आहोत. नाहीतर किरीट सोमय्या यांना चांगला इंगा दाखवला असता. त्यांचे बोलणे सर्व बाहेर काढले असते. आपण पुढील परिणामांचा विचार करत नाही. मी ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बापाला घाबरत नाही, असे सांगत आव्हान दिले.

ईडीला पळवणारे आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत. ईडी आणि ईडीच्या बापालाही आम्ही घाबरत नाही, काही दिवसांपूर्वी भाजपचे सोमय्या कोरेगाव परिसरात येऊन गेले. ते काय बोलतात ते त्यांनाच माहित. ईडी काय, ईडीच्या बापालाही आम्ही घाबरत नाही, असा थेट इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

दरम्यान, भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिली होती, या दाव्याचा पुनरूच्चार शशिकांत शिंदे यांनी केला. विधानसभेच्या गेल्या निवडणुकीच्या अगोदर भाजपने मला १०० कोटींची ऑफर दिली होती; परंतु ती ऑफर मी धुडकावून लावली होती. आमची निष्ठा आमचे नेते शरद पवार आणि ‘राष्ट्रवादी’शी आहे. त्यामुळे मी कधीही शरद पवार यांची साथ सोडणार नाही, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button