मुंबई : अभिनेता अरमान कोहलीच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने छापा टाकला आहे. ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीसाठी हा छापा टाकला. एनसीबीने शुक्रवारी रात्री एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतले होते. ड्रग्जच्या पेडलरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता अरमान कोहलीच्या घरी धाड टाकली आहे.
एनसीबीने कालच टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला अटक केली आहे. काही वेळापूर्वी गौरवच्या मुंबईमधील घरात मादक पदार्थ सापडल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये एनसीबीला एमडी ड्रग्ज, चरस आणि इतर ड्रग्ज मिळाल्या आहेत. चित्रपट अभिनेता एजाज खानच्या केलेल्या चौकशीत गौरवला अटक करण्यात आली आहे. दरम्यान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने मार्च महिन्यात अभिनेता एजाज खानला अटक केली. ड्रग्ज प्रकरणी ड्रग पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर एजाज खानचे नाव समोर आले होते. एजाज खानवर बटाटा गँगमध्ये सहभागी असल्याचा देखील आरोप आहे. एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला अटक केली आहे. शादाबकडून तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज एनसीबीने जप्त केले आहे.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा ड्रग्सची बाजू समोर आली. ड्रग्सचे जाळे बॉलीवूडमध्ये कशाप्रकारे पसरलेल आहे. याचा पर्दाफाश करण्याचं काम समीर वानखेडे यांनी केलं. बॉलिवूडमधील बड्या नावांच्या कुठल्याही दबावाला न झुकता एनसीबीने कायद्याचा धडा शिकवला. बॉलीवूडमध्ये ड्रग्स कशा प्रकारे घेतले जातात? ते कोण पुरवतात? आणि कशाप्रकारे पुरवले जातात? या सगळ्यांचा पर्दाफाश केला आहे. मुंबईमध्ये जे ड्रग्सचे जाळे पसरले होते. त्याला छाटण्याचं काम सुद्धा चोखपणे बजावलं आणि ड्रग्सपासून होणारे नुकसानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती केली. ज्यामुळे मुंबईमध्ये आणि विशेष करून तरुणांमध्ये ड्रग्सच्या असलेल्या प्रमाणाला कमी करण्यास मोठा यश आलं.