शिवसेना खासदार अरविंद सावंतांनी धमकावले; नवनीत राणांची तक्रार
नवी दिल्ली : परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’चे पडसाद आज लोकसभेतही उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे खासदार गिरीश बाटप आणि खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत राष्ट्रपती राजवटीची मागणी लोकसभेत केली. त्यावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपच्या भूमिकेवर बोट ठेवलं. संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यावरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य प्रहारात भाजपने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून जोरदार आवाज उठवला. भाजपचे खासदार गिरीश बापट, पूनम महाजन आणि अपक्ष खासदार नवनीत राणा हे लोकसभेत आक्रमक झाले. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी उडाल्याने सभागृहात गदारोळ झाला. यावेळी भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सत्ताधाऱ्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना खंडणी वसुलीचं टार्गेट दिलं जात आहे. पोलीसच खंडणी मागत असून त्यांना मंत्र्यांचा आशार्वाद आहे. अशावेळी जनतेने कुणाकडे पाह्यचे, असं सांगतानाच हे प्रकरण अत्यंत गंभीर असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली. गिरीश बापट यांनी लोकसभेत संपूर्ण भाषण मराठीत करत ही मागणी केली.
शिवसेना खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी तक्रार केलीय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील प्रश्नांवर संसदेत बोलल्यामुळे सावंत यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय. याबाबत पोलिसांत तक्रार देण्याची तयारीही राणा यांनी केल्याची माहिती मिळत आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचं टार्गेट दिल्याच्या आरोपासह अनेक आरोपांचा समावेश आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा आज लोकसभेतही धमाका झाला. या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमने सामने आले. सिंग यांचे आरोप गंभीर असून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी भाजपने केली. तर, ठाकरे सरकाच्या बचावासाठी पंजाबच्या काँग्रेस खासदाराने जोरदार बॅटिंग करत भाजपला जशास तसे प्रत्युत्तर दिलं.