राजकारण

हा वाघ सर्कशीतला असावा; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरुन नारायण राणेंचा टोला

मुंबई : काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात झालेल्या ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. व्यासपीठावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं सांगितलं. त्यावर वाघ आमच्या इशाऱ्यावर चालतो, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला आहे. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावरुनच आता भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय.

विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार!, अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावलाय. राणे यांनी ट्विट करुन वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर भाष्य करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नारायण राणे हे शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडत नसल्याचं या ट्विटवरुन पुन्हा एकदा पाहायला मिळालं.

मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही, असं म्हटलं. यावर व्यासपीठावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं सांगितलं. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाऱ्याने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे, असं म्हणत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला. यानंतर सभागृहात एकच हंशा पिकला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button