Top Newsराजकारण

नारळी पौर्णिमा साजरी करणारच; मनसेचे सरकारला खुले आव्हान

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवून कोणताही कार्यक्रम करण्यास बंदी आहे. तरीही मनसेकडून दादरमध्ये नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुंबईत सध्या सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोक जमण्यास बंदी आहे. मनसेच्या या कार्यक्रमालाही गर्दी होऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी मनसेचे शाखा अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत. यानंतरही मनसेचे कार्यकर्ते नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम जोशात साजरा करण्यावर ठाम आहेत. त्यामुळे आज दादर परिसरात मनसे आणि पोलीस आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमावरून वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी मनसैनिकांना १४९ ची नोटीस बजावली आहे. मात्र, मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्याचा चंग बांधला आहे.

कोळी बांधवांमध्ये नारळी पौर्णिमेच्या सणाला विशेष महत्व असतं. नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ, श्रीफळ अर्पण करतात आणि पूजा करतात. त्यानंतर मासेमारीसाठी होड्या पुन्हा समुद्रात नेल्या जातात. मात्र, आता यानिमित्ताने मुंबईतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button