मुंबईतील २९ खासगी रुग्णालयांत लसीकरणाला परवानगी
मुंबई : देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. आता मुंबईत ज्येष्ठ नागरिकांना आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना देखील लस देण्यात येत आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा आहे. मुंबईतील २९ मोठ्या खासगी रुग्णालयांत लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. रुग्णालयांनी दिलेले निकष पूर्ण केल्याने त्यांना परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने ही परवानगी दिली आहे.
लसीकरणाबाबत या पुढील सर्व प्रक्रिया राबवण्याच्या महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबईतील 29 खासगी रुग्णालयात कोरोनाची लस उपलब्ध असणार आहे. नुकतंच मुंबई महापालिकेने याबाबची यादी जारी केली आहे. या यादीत रुग्णालयांची नावे देण्यात आली आहे.
मुंबईत ‘या’ खासगी रुग्णालयात मिळणार कोरोना लस
शुश्रुषा रुग्णालय, विक्रोळी
के. जे. सोमय्या रुग्णालय
डॉ. बालाभाई नानावटी रुग्णालय
वॉकहार्ट रुग्णालय
सर एच. एन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालय
सैफी रुग्णालय
पी. डी. हिंदुजा रुग्णालय
डॉ. एल. एच. हिराचंदानी रुग्णालय
कौशल्य मेडिकल फाऊंडेशन
मसीना रुग्णालय
हॉली फॅमिली रुग्णालय
एस. एल. रहेजा रुग्णालय
लिलावती रुग्णालय
गुरु नानक रुग्णालय
बॉम्बे रुग्णालय
ब्रीच कँडी रुग्णालय
फोर्टिस, मुलुंड
द भाटिया जनरल रुग्णालय
ग्लोबल रुग्णालय
सर्वोदय रुग्णालय
जसलोक रुग्णालय
करुणा रुग्णालय
एच. जे. दोषी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालय
SRCC चिल्ड्रन्स रुग्णालय
कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालय
कॉनवेस्ट अँड मंजुळा एस. बदानी जैन रुग्णालय
सुरुणा शेठिया रुग्णालय
हॉली स्पिरीट रुग्णालय
टाटा रुग्णालय
खासगी रुग्णालयात २५० रुपये आकारणार
कोरोना लसीकरणाच्या या टप्प्यात ६० पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच ४५ ते ६० या वयोगटादरम्यान गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांनासुद्धा कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांसह केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीतील निर्धारित रुग्णालयांमध्ये लसीकरण विनामूल्य केले जाणार आहे. तर खासगी रुग्णालयात लसीकरणासाठी प्रत्येक डोससाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.