मुंबई : मुंबईकरांचे मोफत लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने पुढे येऊन लस खरेदी करता ग्लोबल टेंडर काढले होते. परंतु हे ग्लोबल टेंडर रद्द करण्यात आले आहे. ग्लोबल टेंडर काढल्यावर ९ लस पुरवठादार कंपन्यांनी प्रतिसाद दाखवला होता. परंतु कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ९ कंपन्या अपात्र ठरल्या आहेत यामध्ये म्हटले होते की, लास बनवणाऱ्या कंपन्यांनी प्रतिसाद दाखवला नाही परंतु कोरोना लस पुरवठादार होते. प्रत्यक्ष लस उत्पादित करणाऱ्या कंपन्या सामील नसल्यामुळे लस पुरवठादार आणि लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांच्यातील संबंध पडताळून पाहणे आवश्यक होते. जेणेकरुन आपण दिलेली मुदतीत सुरळीतपणे लस पुरवठा होईल याची खात्री पटणे गरजेचे होते. असे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, लस पुरवठादार असलेल्या कंपन्या त्या नेमक्या किती दिवसांत लस पुरवठा करणार आहेत? किती संख्येने लस पुरवठा करणार? किती रक्कम द्यावी लागणार? या सगळ्या अटी शर्थी हे चार मुख्य पैलू होते. यामुळे यावर बारीक लक्ष देऊन पाठपुरावा केला होता. मुदतीनंतर ९ पुरवठादार कंपन्यांनी महापालिकेला कागदपत्र पाठवले नाहीत. महापालिकेने युद्धपातळीवर पुरवठादार कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी केली. यामध्ये एकही पुरवठादार संपूर्ण कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी पात्र ठरु शकले नाहीत.
मुंबई महानगपालिका पुढे प्रयत्न करत आहे. यामुळे पालिकेने कोरोना प्रतिबंधक लस साठा करण्याचा प्रयत्न सुरु ठेवले आहेत. प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलारसू यांनी स्पुटनिक या लसीचे वितरक डॉ. रेड्डीज या लॅबोरेटरीजशी चर्चा केली आहे. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार प्रायोगिक तत्वावर स्पुतनिक लसीचा साठा मुंबई महानगरपालिकेला मिळेल अशी आशा असल्याचे मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. डॉ. रेड्डीजकडून जून ते जुलैमध्ये स्पुटनिक लसींचा साठा देण्याची तयारी दाखवली आहे. म्हणून स्पुतनिक लसीचे शीतगृहाच्या निकषानुसार चाचणी सुरु केली आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात लसीचा साठा मिळण्याची शक्यता आहे. पुढील १० दिवसांत डॉ.रेड्डीजशी चर्चा होणार असल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.