अर्थ-उद्योगस्पोर्ट्स

एमपीएल स्पोर्ट्सची बिलियन चीअर्स जर्सी आता ‘उडान’वर उपलब्ध

मुंबई : बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान टी-20 क्रिकेट सामना अवघ्या काही तासांवर आला आहे. संघाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट चाहते आधीच टीम इंडियाच्या रंगांत रंगले आहेत. क्रीडा क्षेत्रातील लोकप्रिय ब्रँड तसेच भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत किट प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्सनेही हा सामना पाहण्याचा चाहत्यांचा आनंद आणखी संस्मरणीय करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. एमपीएल स्पोर्ट्सच्या अधिकृत टीम इंडिया मर्चंडाइज (वाणिज्यिक वस्तू) आता भारतातील सर्वात मोठा बिझनेस टू बिझनेस (बी 2 बी) प्लॅटफॉर्म उडानवरही उपलब्ध होत आहेत. यासाठी टियर 2 आणि टियर 3 श्रेणीतील शहरांवर जास्त भर दिला जात आहे. या मालिकेत नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या “बिग बिलियन जर्सी”चाही समावेश आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विशाल आणि अत्यंत किफायतशीर दरांतील ही जर्सी चाहत्यांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही ठिकाणी सहज उपलब्ध करून दिली जात आहे.

उडानच्या प्रचंड मोठ्या वितरण नेटवर्कचा फायदा घेत एमपीएल स्पोर्ट्स देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या उत्पादनांची मालिका उपलब्ध करून देणार आहे. उडानकडे देशभरातील 900 पेक्षा जास्त शहरांत 30 लाख नोंदणीकृत वापरकर्ते आणि 25,0000 ते 30,000 विक्रेत्यांचे नेटवर्क आहे. या माध्यमातून 12,000 पिनकोडपेक्षाही जास्त शहरांतपर्यंत सेवा पुरवली जाते. या प्लॅटफॉर्मद्वारे 1.7 दशलक्ष रिटेलर्स, केमिस्ट्स, किराणा दुकाने, हॉटेल्स, रेस्तराँ, केटरिंग (HoReCa), शेतकरी आदींना सेवा पुरवली जाते. दरमहा तब्बल 4.5 दशलक्ष व्यवहारांच्या बळावर उडान हे व्यासपीठ बी 2 बी ई कॉमर्स व्यवसायातील अग्रणी बनले आहे. एमपीएल स्पोर्ट्सचे मर्चंडाइज लुलु फॅशन, ऑल डे स्पोर्ट्स, सेंट्रो, चॅम्पियन स्पोर्ट्स, शक्ती स्पोर्ट्स, किटको, स्पोर्ट्स स्टेशन आणि इतर आघाडीच्या रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध करून दिले जात आहे.

याबाबतची घोषणा करताना एमपीएल स्पोर्ट्सचे प्रमुख शोभित गुप्ता म्हणाले, “भारतात क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून ती देशभरातील नागरिकांना एका धाग्यात गुंफणारी एक भावना आहे. यंदाचा क्रिकेट हंगाम पूर्ण भरात असून भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत मर्चंडाइज सर्वांना परवडणाऱ्या दरांत सुलभपणे उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. उडानच्या विस्तृत नेटवर्कचा पूरेपूर वापर करत देशभरातील अब्जावधी चाहत्यांना आपल्या संघाच्या रंगांनी रंगलेले मर्चंडाइज वापरून भारतीय संघाला प्रोत्साहन देण्याची संधी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे.“

उडानचे लाइफस्टाइल बिझनेस हेड कुमार सौरभ म्हणाले की, “आमच्या देशभरातील रिटेलर्ससाठी विशेषपणे एमपीएल स्पोर्ट्सचे अधिकृत क्रिकेट मर्चंडाइज उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत आहे. तंत्रज्ञान आधारित आमच्या व्यापक नेटवर्कचा वापर करून भारतभरातील विक्रेते आणि ग्राहकांना हे उच्च दर्जाच्या अस्सल मर्चंडाइज अगदी किफायतशीर दरांत उपलब्ध करून देण्याचा आम्ही खात्री देत आहोत. भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून सामन्याचा थरार अनुभवण्याचा आग्रह आम्ही करत आहोत. कारण प्रथमच हे अस्सल मर्चंडाइज अगदी परवडणाऱ्या दरांत त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले जात आहे.”

एमपीएल स्पोर्ट्स टीम इंडियाच्या अधिकृत मर्चंडाइजचा समग्र संग्रह उपलब्ध करून देत आहे. यात प्लेअर एडिशन आणि स्टेडिअम जर्सी, ऑन पीच स्टाइल्सवर आधारित ट्रेनिंग गिअर्स पोलोज हे प्रकार महिला व पुरुष अशा दोन्हींसाठी उपलब्ध आहेत. अब्जावधी चाहत्यांचा जयघोष आणि जल्लोषापासून प्रेरणात घेत बिग बिलियन जर्सीची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासात प्रथमच जर्सीच्या माध्यमातून त्यांना आपले पॅशन प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button